तळेगाव मध्ये सतरा वर्षीय युवकाची हातोड्याने हत्या: इंस्ट्राग्राम स्टेटस बेतले जिवावर

तळेगाव मध्ये सतरा वर्षीय युवकाची हातोड्याने हत्या: इंस्ट्राग्राम स्टेटस बेतले जिवावर

मावळ तालुक्यातील तळेगावमध्ये एका १७ वर्षीय मुलाची इंस्ट्राग्राम स्टेट्सवर खुन्नस दिल्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

दशांत अनिल परदेशी (रा तळेगाव ता.मावळ) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे

मिळालेल्या माहितीनुसार, सख्ख्या चुलत भावाने मित्राच्या मदतीने तळेगावमधील दशांत परदेशीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आल आहे. लोखंडी हतोड्याने डोक्याच्या मागून आणि मग डोळ्यावर प्रहार केला. दशांत नेहमी खुन्नस देत धमकावायचा, तसेच काही दिवसांपूर्वी फक्त 302 अशे स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस फक्त दोन्ही आरोपींनाच दिसत होते. त्यामुळे सख्खा चुलत मोठा भाऊ कमलेश परदेशी आणि मित्र प्रकाश लोहार काटा काढायचा कट या दोघांनी रचला.

दशांतला फोटो व्हिडीओ काढून इंन्स्टाग्रामवर शेअर करण्याचा छंद होता. त्यामुळे दोन्ही आरोपींनी फोटो काढून इन्स्टाग्रामवर शेअर करण्याचा बहाणा बनवून प्रकाशने दशांतला फोन करून बोलावलं. सायंकाळी सहाच्या सुमारास दोन्ही आरोपी त्याला भेटले त्यानंतर तिथून एका बंद कंपनी जवळ पोहचले. दशांतने त्याच्या फोनवर या दोघांचे फोटो काढत असताना, तेंव्हाच एकाने हातोड्याने डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर डोळ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दशांतचा जागीच मृत्यू झाला.