दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होवून बाप गंभीर जखमी तर मुलगा जखमी.

दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होवून बाप गंभीर जखमी तर मुलगा जखमी.

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.
राजगुरूनगर शहराच्या मध्यवर्ती भागातून दुचाकीस्वार चिमुकल्या मुलासह दुचाकीवरुन आज सकाळी जात असताना अचानक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात चिमुकल्या मुलासह दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली असुन दोघांनाही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज सकाळच्या सुमारास संतोष शेवाळे हे आपला मुलगा यश याला दुचाकीवरुन घेऊन जात असताना घरापासून काही अंतरावर ही दुदैवी घटना घडली. या घटनेत दुचाकी चालक संतोष शेवाळे यांच्या कंबरेखाली व दोन्ही पाय फुटुन रक्तबंबाळ झाला तर मुलगा यश यांच्याही दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत.

ज सकाळीच्या सुमारास वडील मुलासह आपल्या दुचाकीवरुन प्यायला पाणी आणण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. यावेळी जखमी व्यक्ती व मुलाला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.