दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या पत्राद्वारे पाठवल्या दुग्धविकास मंत्री यांना….

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या पत्राद्वारे पाठवल्या दुग्धविकास मंत्री यांना….

संदिप मेदगे प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

 अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य समिती, दूध प्रश्नांची सोडवणूक होणेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे….

किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ किसन गुजर व कार्याध्यक्ष माजी आमदार जिवा पांडू गावीत व राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरातून मा. ना. श्री. सुनील केदार साहेब
दुग्धविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना दूध उत्पादक शेतकरी यांच्या मागण्या सोडविण्यासाठी, *लेटर* टू *डेअरी* *मिनिस्टर* असे राबविण्यात येत आहे..

या अभियाना अंतर्गत राज्यभरातून हजारो दूध उत्पादक शेतकरी यांनी दुग्धविकास मंत्री यांना पत्रे पाठवली आहे….

नुकतीच *पुणे* जिल्ह्यातील *खेड* तालुक्यातील विविध गावातून शेकडो पत्रे मा.दुग्धविकास मंत्री यांना पाठवण्यात आली..

या अभियानाचे संयोजन,खेड किसान सभा,तालुका समितीचे अमोद गरुड, महेंद्र थोरात,विकास भाईक,किसनराव ठाकूर,भाऊसाहेब सरडे, यांनी केले होते…

दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खालील मागण्या पत्राद्वारे मा.दुग्धविकास मंत्री यांच्याकडे करण्यात आल्या….
 
1. गायीच्या दुधाला प्रति लिटर ३५ रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ६० रुपये दर द्या.

2. लॉकडाऊन काळातील लुटवापसी म्हणून शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्या.
  
3. खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा.

4. दुधाला एफ.आर.पी. आणि रेव्हेन्यू शेअरींगचे कायदेशीर संरक्षण द्या.

5. अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी ‘एक राज्य एक ब्रँड’ हे धोरण स्वीकारा.

6. भेसळ मुक्तीची कायदेशीर हमी द्या. 

7.  सदोष मिल्को मिटर द्वारे होणारी लुट थांबविण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करा.

8.  शासकीय अनुदानातून पशु विमा योजना सुरु करा.

9.  राज्यात दुध मूल्य आयोगाची स्थापना करा.