देश महासत्ता करणेसाठी गावे स्वच्छ समृद्ध आणि स्वयंपूर्ण केले पाहिजे-भास्कर पेरे पाटील.

देश महासत्ता करणेसाठी गावे स्वच्छ समृद्ध आणि स्वयंपूर्ण केले पाहिजे-भास्कर पेरे पाटील.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

देश महासत्ता करणेसाठी गावे स्वच्छ समृद्ध आणि स्वयंपूर्ण केले पाहिजे आर्थिक नियोजन बारकाईने करावे. नागरिकांना उत्तम सुविधा झाली तर नागरिक कर द्यायला मागे राहत नाही हे आम्ही आमच्या पाटोदा गावी सिद्ध केले आहे.
ग्रामपंचायत सार्वभौम संस्था असून सरपंच हा सर्वात मोठा लोकप्रतिनिधी आहे. सरपंचांनी आपले अधिकार वापरताना सेवावृत्तीने काम केले पाहिजे आणि काळ आणि प्रसंग बघून निर्णय घेतले पाहिजेत.
केवळ लोकांना बरे वाटेल असे निर्णय घेता काही धाडसी निर्णय घेऊन गावाला शिस्त लावली पाहिजे.
असे विचार आदर्श गाव पाटोदा चे शिल्पकार माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी येथे व्यक्त केले.
जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी आपल्या जिल्हा परिषद गटातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी आयोजित केलेल्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना शरद बुट्टे पाटील म्हणाले की माझ्या जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास साधताना माझे सरपंच उपसरपंच आणि सदस्य सक्षम आणि कार्यक्षम झाली पाहिजे यासाठी महिला आणि पुरुषांचे स्वतंत्रपणे दोन प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहेत.
गावात प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मार्ग काढताना लोकप्रतिनिधींना शासनाच्या योजना, कायदे आणि नियम यांची जाण असावी याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. गाव पातळीवरील लोकप्रतिनिधी काय करावे आणि काय करू नये हे त्यांना माहीत असेल तर ते उत्तम काम करू शकतील यासाठी सर्व योजनांची माहिती लेखी स्वरूपात सर्वांना उपलब्ध करून देत आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्य अमोलदादा पवार, वराळे चे सरपंच दिनेश लांडगे कोरेगाव चे उपसरपंच रोहित डावरे पाटील, सुनील देवकर ,संजय रौंधळ कार्यकर्ते काय करतेस आपले कार्य, विस्ताराधिकारी एचडी थोरात यांचेसह मतदारसंघासह तालुक्यातील अनेक गावचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षणार्थी अक्षय गाडे, नाना रौंधळ, राजू झांबरे, सचिन देवकर, सुरेश पिंगळे,विकास ठाकूर , सत्यवान वाळुंज यांनी मनोगत व्यक्त केली. प्रास्ताविक रोहित डावरे पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील देवकर यांनी केले आभार मच्छिंद्र शेटे गुरुजी यांनी मानले.