धार्मिक स्थळांच्या पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनासाठी ठोस काम झाले पाहीजे-जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट.

धार्मिक स्थळांच्या पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनासाठी ठोस काम झाले पाहीजे-जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील जनता ही पुर्णपणे शेतीवर अवलंबून असून,या भागातील शेतकरी व महिला यांचा आर्थिक विकास होण्यासाठी धार्मिक स्थळांच्या पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनासाठी ठोस काम झाले पाहीजे असे मत
जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांनी कडूस येथे व्यक्त केले.

कडूस येथील विठ्ठल रूक्मीणी देवस्थान,टोकेवाडी येथील गणेश मंदिर,चास येथील सोमेश्वर मंदिर,कुंडमाउली देवस्थान,वाडा येथील गडदुदेवी मंदिर,भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिर व भोरगड,
या धार्मिक स्थळांकडे भाविक भक्ताबरोबर पर्यटकांचा ओघ वाढला आहे.याचबरोबर आंबोली वांद्रा व भोरगिरी ही तालुक्याच्या पश्चिम भागातील गावे पावसाळ्यामध्ये हिरवाईने नटलेली असतात.यामुळे धार्मिक व निसर्ग पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनाला चालना दिल्यास शेतकरी बांधवासाठी हक्काचा रोजगार प्राप्त होणार असून पुढील काळात कृषी पर्यटनाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे घनवट यांनी सांगीतले.

कङूस(ता.खेड) येथे उद्योजक संजय घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा- कङूस जिल्हा परिषद गटाच्या आदर्श जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांच्या निधीतून सुमारे ३५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तनुजा घनवट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

कङूस ढमाले शिवार ते गोलापूर रस्ता २५ लाक्ष, टोकेवाडी नळ पाणी पुरवठा करणे ५ लाख, कङूस खंडेवाडी येथे नळ पाणी पुरवठा करणे ५ लाख रुपयांचा भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी सरपंच निवृत्ती नेहेरे, सदस्य अरुण शिंदे, प्रतिक्षा ढमाले, चांगदेव ढमाले, शामराव ढमाले, संतोष ढमाले, दिलीप ढमाले, शंकरराव कावडे, बाळासाहेब बोंबले, भगवान ढमाले, सुदाम ढमाले, अंकुश ढमाले, सुभाष बोंबले,अमोल ढमाले, निलेश ढमाले, नयन ढमाले, राजेंद्र गायकवाड, अरुण अरगडे, सुशिल पोटे, भानुदास ढमाले, शंकर ढमाले, योगेश ढमाले, अक्षय ढमाले, रमेश शेळके, आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.