धुवोली /वांजाळे गावात विज अटकाव यंत्रणा कार्यान्वित.

धुवोली /वांजाळे गावात विज अटकाव यंत्रणा कार्यान्वित.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

धुवोली गावातील श्री दत्त मंदिर परिसरात विज अटकाव यंत्रणेची उभारणी करण्यात आली. विज अटकाव यंत्रणा पावसाळ्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या अवकाशीय कडाडणाऱ्या विजेपासुन गावच्या नागरिकांचा बचाव होण्यास मदत होणार आहे. विज अटकाव यंत्रणेपासुन सुमारे 1 किलोमीटर परिसरात अकस्मात विजेचा धोका टळु शकतो. तसेच विजेच्या नैसर्गिक आपत्तीमुळे मनुष्य व प्राणीमात्रांची जीवितहानी टाळण्यासाठी भविष्यात विज अटकाव यंत्रणा गावच्या हिताची ठरणार आहे. यामुळे धुवोली वांजाळे गावाला याचा फायदा होणार आहे. अस मत धुवोली /वांजाळे ग्रामपंचायतचे आदर्श उपसरपंच शरदभाऊ जठार यांनी सांगितले. त्यावेळी सरपंच शैला वाघ, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. गोविंद जठार, श्री. हरिभाऊ जठार, बाळासाहेब थोरात( पाटील), कु. अमोल जठार, ग्रामसेवक तावरे भाऊसाहेब उपस्थित होते.