नायफड ता.खेड येथे पाण्यासाठी वृद्ध माता भगिनींना करावी लागते पायपीट.

नायफड ता.खेड येथे पाण्यासाठी वृद्ध माता भगिनींना करावी लागते पायपीट.
डेहणे ता.खेड प्रतिनीधी
आपल्याला असे वाटेल की मे व जून महिना असल्यामुळे अनेक गावातील ग्रामस्थांना पाणीसाठे शोधत आपल्या निवासी वस्त्यापासून दूर पाणी आणण्यासाठी जावे लागते. परंतु चिंतेची गोस्ट ही आहे की नायफड गावातील नाव्हाची वाडी जवळपास 100 घरे असलेली ही वाडी आहे. परंतु या वस्थितील लोकांना बाराही महिने पिण्याच्या पाण्यासाठी आपल्या घरापासून एक किलोमीटर डोंगर चढावर डोक्यावर पाण्याचे हांडे घेऊन यावे लागते.
रविवार दिनांक 23 मे रोजी ग्रामपंचायत सदस्य सुनील मिलखे व वेगवेगळ्या सामाजिक चळवळीत काम करणारे विकास भाईक तसेच तरुण कार्यकर्ते श्याम मिलखे यांनी पाणी वाहणाऱ्या माता भगिनी याना भेट देऊन त्यांचे दुःख जाणून घेण्याचे प्रयत्न केले. चर्चा करत असताना अनेक वृद्ध महिलांचा गळा दाटुन आला. अनेक महिलांनी आम्हाला पाण्याची पाईपलाईन उपलबद्ध झाली तर खूप मदत होईल अशी विनंती केली. वृद्ध महिलांना एक कळशी डोक्यावर आणणे सुद्धा शक्य होत नाही असे माहितीतून समोर आले. तसेच पावसाळी दिवसांत डोंगर चढावर डोक्यावर पाणी घेऊन येत असताना अनेक वेळा पाय घसरून पडावे लागते.
यावर प्रतिक्रिया देताना ग्रामपंचायत सदस्य सुनिल मिलखे यांनी सांगितले की मी लवकरात लवकर ग्रामपंचायत मध्ये नाव्हाची वाडीचा पाणी प्रश्न मांडून सरपंच व ग्रामसेवक यांसोबत चर्चा करून आपला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील. व वेळप्रसंगी ग्रामस्थांसाठी आक्रमक पवित्रा सुद्दा घेईल.
तसेच विकास भाईक यांनी ग्रामस्थांशी बोलताना सांगितले की मागील पाच वर्षात नायफड ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाकडे गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकोणतीस लाख रुपयांचा आराखडा देऊन पैश्यांची मागणी केली होती. मग असे असताना ग्रामपंचायतीने का ते पूर्ण एकोणतीस लाख रुपये खर्च करून या जनतेचा पाणी प्रश्न सोडवला नाही. का ते पैसे माघारी जाऊ दिले. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच ग्रामपंचायतीने सहकार्य करून या ग्रामस्थांची समस्या सोडवण्यासाठी ठोस कृतीशील पाऊले उचलावीत अश्या प्रकारचे आवाहन त्यांनी ग्रामपंचायतीला केले.