नायफड ( ता खेड ) येथे विद्यार्थी सत्कार व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सन्मान

नायफड ( ता खेड ) येथे विद्यार्थी सत्कार व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सन्मान

वाडा. प्रतिनिधी

“ खेड तालुक्याचे पश्चिम भागत शालेय सुविधांचा आभाव असल्याने ग्रामीण विद्यार्थी घवघवीत यश मिळविताना वंचित रहातात. परंतु शिक्षकांनी परिश्रम घेतले तर अनेक विद्यार्थी यशाचा शिडी सहज चढून जाऊ शकतात यासाठी विद्यार्थ्यांनीही इच्छित ध्येय समोर ठेवून त्याकडे वाटचाल करायला हवी ”. नायफड (ता.खेड) येथील शिष्यवृत्ती धारक गुणवंत विध्यार्थीचा सत्कार व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सन्मान कार्यक्रमात मार्गदर्शन करताना खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी बोलताना ते बोले की, सन्माना मागील हेतू समाजातील गुणांचीकदर, कर्तृत्ववान लोकांचे त्यांच्या यशाबद्दल कौतुक करुन पुढील वाटचाली साठी त्यांना प्रोत्साहीत करणे, समाजात गुणवंत लोकांचे कौतुक होतांना फारसे दिसत नाही. पालकांच्या समोर आपल्या मुलांचा सत्कार, सन्मान होतांना पाहून त्यांना होणारा आनंद अगणित असतो. समाजातील बुद्धीवंत मुले या कार्यक्रमामुळे समाजा समोर येतात. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत गुणवत्तेत आम्हीसुद्धा मागे नाही हे दाखवत नायफड येथील सुमित आढारी, प्रांजली ठोकळ व सुप्रिया शिंदे या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले. यावेळी मार्गदर्शक शिक्षक धनराज अचवलकर यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी सेवानिवृत्त झालेले झालेले शिक्षक बबन तिटकारे, रामचंद्र तिटकारे , रघुनाथ कावळे यांचाही सन्मान करण्यात आला . या या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती धारु गवारी, सदस्य विठ्ठल वनघरे, दूध संघाचे संचालक लक्ष्मण तिटकारे , विस्ताराधिकारी जीवन कोकणे, केंद्रप्रमुख भरत लोखंडे, एकनाथ लांघी, तानाजी म्हाळूंगकर, काळुराम ठाकूर, सुरेशराव नाईकरे, रामचंद्र शिंगाडे सर, नवनाथ ढोकले, खेड तालुका शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते . केंद्रातील सर्व शिक्षक, ग्रामसेवक लकारे, मारुती शिंदे, व नवनिर्वाचित सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विशाल शिंदे यांनी केले व बुरसे सर यांनी मान्यवरांचे आभार मानले.