नायफड ( नाव्हाची वाडी ) पाणी प्रश्न निकाली न काढल्यास अखिल भारतीय किसान सभा पुणे यांचा आंदोलनाचा इशारा.

नायफड ( नाव्हाची वाडी ) पाणी प्रश्न निकाली न काढल्यास अखिल भारतीय किसान सभा पुणे यांचा आंदोलनाचा इशारा.

नाव्हाची वाडी येथील ग्रामस्थांचा पाणी प्रश्न आतिशय गंभीर असल्याची बातमी अनेक वर्तमानपत्रात छापून आली होती. व यावर प्रतिक्रिया देताना ग्रामसेवक शितल लकारे या म्हंटल्या होत्या की त्या वस्तीत साधी दोन चाकी सुद्धा जात नाही. त्यामुळे त्यांचा पाणी प्रश्न सध्या तरी सोडवता येणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. परंतु वर्तमान पत्रांनी ग्रामस्थांची बाजू ठामपणे मांडल्यामुळे सोमवार दिनांक 31 मे रोजी ग्रामसेवक शितल लकारे, सरपंच काळूबाई मेमाने, माजी सरपंच दत्ता तिटकारे तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांना भेट देण्यास जेथे दोन चाकी गाडी जात नव्हती अश्या ठिकाणी चारचाकी घेऊन गेले व भेट दिली होती. परंतु त्या ठिकाणी जाऊन सरपंच व ग्रामसेवक यांनी लोकांना सांगितले की सर्व निधी तुमच्या वस्तीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी खर्च केला तर बाकी वाड्या वस्त्यांना कुठून पैसे आणायचे तसेच पैसे कमी असल्यामुळे आम्ही हा प्रश्न नाही सोडवू शकत नाही. अश्या प्रकारची चर्चा झाली. या सर्व चर्चेतून या ग्रामस्थांच्या पदरात काहीच पडले नसल्यामुळे ग्रामस्थ निराश झाले व या ग्रामस्थांनी किसान सभेच्या कार्यकर्त्यांना या प्रश्नावर कायमस्वरूपी मार्ग निघावा यासाठी चर्चा करण्यासाठी शनिवारी बोलावले. व ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन पुणे जिल्हा किसान सभेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन ओढ्यातील पाण्याची विहीर व लोक वस्ती हा प्रवास ग्रामस्थांसोबत करून विहीर व डोंगर चढवरील वस्तीचा आढावा घेतला व ग्रामस्थांशी साडेतीन तास सखोल चर्चा केली. ग्रामस्थांनी चर्चेत सांगितले की उन्हाळी दिवसांत आम्हाला पाणी आणायला त्रास होतो यात काही शंका नाही परंतु आमच्या वस्तीतील लोकांना पावसाळी दिवसांत ओढ्याला पूर येतो तरी सुद्धा आम्हाला जीव मुठीत धरून ओढ्यातील कंबरेच्या वर पाण्याचा पूर पार करून पाणी आणावे लागते. अश्या वेळी कधी पाण्यात पाय घसरेल व कधी पुराच्या पाण्यात वाहून जाऊ ही भीती धास्तावत असते. त्यामुळे आम्हास आतिशय लवकरात लवकर पाण्याची नळ योजना मिळावी अशी विनंती केली. तसेच वस्तीसाठी नळ योजनेसाठी आम्हास अनेक काही संस्था मदत करायला तयार आहेत पण आम्हाला ग्रामपंचायत मधून ठराव मिळत नसल्याने आम्ही हतबल होतो, डांबरी रस्ता ते वस्ती अंतर्गत रस्ता हे १५० मीटरचा रस्ता ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे पण त्याचे काम अजून पूर्ण झाले नाही. अश्या प्रकारच्या मागण्या ग्रामस्थांनी केल्या.
यावर बोलताना किसान सभेचे नेते अशोक पेकारी यांनी सांगितले की आपण ग्रामपंचायत मधून लवकर ठराव घेऊन रोटरी क्लब तसेच जानकी बजाज यासारख्या मदत करणाऱ्या संस्था आहेत यांकडून पाणी टाकी व पाईप लाईन साठी मदत घेऊ. तसेच ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत जो रस्ता आला आहे. त्याची मान्यताप्राप्त प्रत भेटली तर आपण त्या विषयावर BDO यांच्याशी चर्चा करू.
तसेच विकास भाईक यांनी सांगितले की वारंवार ग्रामपंचायत ला या विषयावर माहिती देऊनही ते या विषयांकडे जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतील तसेच दोन महिन्यांत पाणी प्रश्न जर मार्गी नाही लागला तर आम्ही सर्व वाडीकर ग्रामपंचायत समोर लोकशाही मार्गाने मोर्चा आणू असा इशारा त्यांनी दिला. तसेच वर्षभरातून ग्रामपंचायत आमच्यासाठी एक रुपया सुद्दा खर्च करत नसेल तर मग आमच्यासाठी दरवर्षी दरडोई 432 रुपये सरकार देते त्याचा वापर कोठे होतो.त्यामुळे आमच्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जाव्यात अश्या प्रकारचे आवाहनही त्यांनी केले.
या चर्चेसाठी अखिल भारतीय किसन सभेचे अशोक पेकरी, विकास भाईक, सखाराम जोशी हे कार्यकर्ते होते तर त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य सुनिल मिलखे, दामू कावळे, मधू कावळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश तिटकारे, युवा कार्यकर्ते श्याम मिलखे, मुंबईत पोलिस सेवेत कार्यरत असलेले अनिल मिलखे, हे ग्रामस्थ उपस्थित होते.