निरामय नेत्रालयातर्फे सफाई कर्मचाऱ्यांसाठी नि शूल्क नेत्रातपासणी शिबीर संपन्न

निरामय नेत्रालयातर्फे सफाई कर्मचाऱ्यांसाठी नि शूल्क नेत्रातपासणी शिबीर संपन्न

राजगुरूनगर प्रतिनीधी
मु.पो.ग्रामीण.

राजगुरूनगर येथील अद्ययावत व आघाडीचे नेत्रारुग्णालय ” निरामय नेत्रालय” यांच्या तर्फे राजगुरूनगर नगरपरिषदेच्या सफाई विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्रातापासणी शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. नेत्रालयाच्या संचालिका डॉ शीतल ढवळे खिसमतराव यांनी स्वतः सर्व कर्मचाऱ्यांची नेत्रातपासणी व त्यांस योग्य मार्गदर्शन केले. सदर शिबिरात सुमारे 50 सफाई कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांची नेत्रातपासणी केली गेली व गरजूना अत्यल्प दरात चष्मे देखील उपलब्ध करून दिले गेले.
श्री राहुल पिंगळे, डॉ धनंजय पिंगळे, श्री प्रदीप घुमटकर व श्री कैलास सांडभोर यांच्या पुढाकाराने हे शिबीर संपन्न झाले.