पत्रकार व बँकेचे अधिकारी यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर सर करत गवसणी घातली.

पत्रकार व बँकेचे अधिकारी यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर सर करत गवसणी घातली.

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

सह्याद्री पर्वत रांगांमधील महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असणारे कळसूबाई शिखर तब्बल दिड तासांत सर करण्याची किमया राजगुरूनगर, खेड तालुक्यातील कङूस येथिल पत्रकार तुषार मोढवे व वाडा बँकेचे विकास अधिकारी रघुनाथ मुळूक या सह्याद्रीच्या दुर्गप्रेमींनी पुर्ण करत शिखरावर स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत मोहत्सवी वर्षे निमित्तानं पुर्ण झाल्याने हातात भगवा आणि तिरंगा घेऊन जल्लोष केला.
अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई शिखराला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून ५४०० फूट (१६४६ मीटर) उंच हे शिखर आहेतर पायथ्याच्या बारी, जहागीरदार वाडी गावातून ऊंची सुमारे ९०० मीटर आहे.
कळसूबाई शिखर सर करताना मोठ्या लोकांना ट्रेकर्सनां सुद्धा कधी कधी शक्य होत नाही, मात्र या अधिकाऱ्यांनी
मुसळधार पावसात सुद्धा एव्हरेस्ट शिखराला गवसणी घातल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
या अधिकाऱ्यांनानी याच तालुक्यातील अतिशय अवघड हरिचंद्र गड, रतनगड, चांदन व्हँली ट्रेक, पुर्ण करण्याची मोहिम फत्ते केली आहे.
तसेच नुकताच नवरात्र उत्सव झाला असून कळसुबाई गडावर प्लॅस्टिकचे कागद पडलेले पहाताच त्यांनी ट्रेकिंग सोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश देत परिसरात स्वच्छता मोहिम राबवली.
तुषार मोढवे व रघुनाथ मुळूक यांना ट्रेकिंगची आवड असून त्यांनी चंदनवंद, महिमान गड, वारू गड, हडसर, चांवड, तिकोना, तुंग,
कमळगड, जिवधन, विशाळगड, कोथळीगड, वासोटा, राजगड, रायगड, तोरणा, सिंहगड, प्रतापगड आदी सह खेड तालुक्यातील सर्व दुर्लक्षित ट्रेक पुर्ण केले आहेत.
# पत्रकार तुषार मोढवे हे एक धाडसी, निरभिड, व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे परिसरात पाहिले जाते. शालेय जीवनापासुनच ते जिद्दी आणि धाडशी विद्यार्थी म्हणुन ओळखले जातात. त्यांनी पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, परिसरातील अनेक गड, किल्ले ट्रेकिंग करत पुर्ण केले आहेत.

गिरीभ्रमण ग्रुपच्या माध्यमातून अनेक ट्रेक केले यामध्ये पञकार राजेंद्र लोथे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच ट्रेक यशस्वी पार पाडले.आमचे सहकारी मिञ पञकार तुषार मोढवे व रघुनाथ मुळुक साहेब हे वैयक्तीक कारणामुळे कळसुबाई ट्रेकला आले नव्हते.त्यांनी दिड तासात ट्रेक पुर्ण करून आमच्या गिरीभ्रमण ग्रुपचा अभिमान वाढवला आहे.याबद्दल गिरीभ्रमण ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र लोथे साहेब,राजेंद्र नाईकरे सर,केशव नाईकरे सर,सुधीर नाईकरे,निलेश घेवडे,संदिप मेदगे,अनिल जाधव,निवृती नाईकरे पाटील,यासह असंख्य सभासद यांनी या दोन्ही गिरीभ्रमण करणार्‍यांचे कौतूक केले आहे.