पुणे जिल्हाच्या ग्रामीण भागात ओमायक्रॉन चा शिरकाव!जुन्नर तालुक्यात ७ रूग्ण!

पुणे जिल्हाच्या ग्रामीण भागात ओमायक्रॉन चा शिरकाव!जुन्नर तालुक्यात ७ रूग्ण!

जुन्नर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

कोरोनाचा  नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. पुण्यातील शहरी भागात ओमायक्रॉनने एंट्री केली आहे. त्यापाठोपाठ आता ग्रामीण भागात सुद्धा ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. जुन्नरमध्ये ओमायक्रॉनचे ७ रुग्ण आढळून आले आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ओमायक्रॉनचे ७ नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. चाचणीअंती ७ जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णांना कोणतीही लक्षणं जाणवत नाही. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.