पुणे जिल्हाच्या ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल!वाचा सविस्तर!

पुणे जिल्हाच्या ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल!वाचा सविस्तर!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील निर्बंध सोमवारपासून (दि.16) शिथिल करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील कोरोना बाधित दर हा पाच टक्क्यांहून कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. सर्व दुकाने, हॉटेल, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
हॉटेल, दुकानांमधील सर्व कर्मचार्‍यांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन चौदा दिवसांचा कालावधी झालेला असावा आणि मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिम, योगासेंटर, सलून, स्पा, रात्री दहा वाजेपर्यंत पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत.