पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा.सौ निर्मलाताई पानसरे यांचा पश्चिम भागात पहाणी दौरा.

 

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा.सौ निर्मलाताई पानसरे यांचा पश्चिम भागात पहाणी दौरा.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

दि.२१जुलै२०२१ च्या रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे खेड तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मा.आमदार दिलीपशेठ मोहीते पाटील यांच्या सूचनेनुसार मा.पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष.सौ निर्मलाताई पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील पश्चिम भागाचा दौरा करण्यात आला.अवकाळी पावसाने ओढयांना खूप मोठा पूर आल्यामुळे ओढ्यालगत असलेले शेतांचे बांध तोडून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बऱ्याच प्रमाणात वाहून आलेल्या माती मुळे लागवडीखालील भाताचे नुकसान झाले आहे अनेक पुलांवरून पाणी गेल्यामुळे संरक्षक कठडे आणि रेलिंग यांचेही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच नायफड येथील नव्याने झालेल्या वाघदरा येथील पाझर तलाव फुटुन फार मोठे नुकसान झाले आहे.
आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील आणि सौ.निर्मलाताई पानसरे यांच्या सूचनेनुसार पश्चिम भागात मा.तहसीलदार,सर्कल,तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि इतर अधिकारी यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासकीय वस्तूंचे आणी शेतांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तात्काळ निधीची तरतूद करण्याचे मागणी मा.जिल्हाधिकारी देशमुख साहेब यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी मा. सभापती अरुणशेठ चांभारे,तहसिलदार वैशाली वाघमारे,सर्कल शरद गोडे,उपसभापती विठ्ठलशेठ वनघरे,सरपंच दत्ताशेठ खाडे,मा.लक्ष्मण तिटकारे, मा.सुजाताताई पचपिंड,किरण वाळुंज,सरपंच दत्तात्रय हिले,दत्ता वनघरे,निलेश घेवडे,शिवाजी पचपिंड हे उपस्थित होते.