पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या संचालकपदी आमदार दिलीपराव मोहिते पाटील बिनविरोध!

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या
संचालकपदी आमदार दिलीपराव मोहिते पाटील बिनविरोध!

 

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या
(पीडीसीसी) संचालक पदासाठी खेड तालुक्यातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून,प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शरद बुट्टे पाटील यांनी माघार घेतल्यामुळे माघारीच्या अंतीम क्षणाला आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड तालुक्यातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेंचे संचालक असताना मोहिते पाटील यांनी धडाडीचे निर्णय घेवून,शेतकरी हित जोपासले आहे.त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे शेतकरी वर्गाने आनंद व्यक्त केला.