पुणे-नाशिक महामार्गावर वाकी खुर्द गावच्या हद्दीत एक कोटीचा गुटखा जप्त, एकास अटक

पुणे-नाशिक महामार्गावर वाकी खुर्द गावच्या हद्दीत एक कोटीचा गुटखा जप्त, एकास अटक

चाकण प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

चाकण : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करताना १,०१,२०,०००/- (एक कोटी एक लाख विस हजार) रु. किंमतीचा गुटख्याचा मुददेमाल चाकण पोलीसांकडुन जप्त करण्यात आला असून याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गणेश विठठल भाडळे ( वय ३२ वर्षे, रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी कि, दि. १०/०७/२०२२ रोजी पहाटे ०५/०० वा. चे सुमारास चाकण पोलीसांना पुणे-नासिक महामार्गावरून पुणे येथे अवैधरित्या गुटख्याचा टेम्पो जाणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदार यांचेडुन माहिती मिळाली. चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी अधिकारी व अंमलदार यांना बातमीची खात्री करून कायदेशिर कारवाई करण्याच्या सुचना व मार्गदर्शन केले. त्यावरून चाकण पोलीसांनी मिळालेल्या माहितीचे आधारे वाकी खु ॥ परिसरात नाशिक-पुणे महामार्गावरील रोहकल फाटयाचे स्पिड ब्रेकर जवळ सापळा रचुन टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक ( एम एच २२ ए ए १७१० ) याचेवर छापा टाकुन सदर टेम्पोची तपासणी केली असता सदर टेम्पोमध्ये आरएमडी पान मसाला व एम सुगंधी तंबाखु असलेला एकुण ९१,२०,००० /- रूपये किंमतीचा गुटख्याचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला माल मिळुन आला आहे.

सदरचा गुटखा व वाहतुक करण्यासाठी वापरलेला टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक ( एम एच २२ ए ए १७१० ) असा एकुण १,०१,२०,०००/- (एक कोटी एक लाख विस हजार रूपये ) किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला असुन सदर माल वाहतुक करणारा आरोपी गणेश विठठल भाडळे ( वय ३२ वर्षे, रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे ) यास अटक करण्यात आली. त्याचे विरोधात चाकण पोलीस स्टेशन गुरनं. १११५/२०२२ भादवि कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.

सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ- १ मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सपोनि प्रसन्न ज-हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण, सहाय्यक फौजदार सुरेश हिंगे, पोलीस हवालदार संदिप सोनवणे, भैरोबा यादव, हनुमंत कांबळे, निखील शेटे, चेतन गायकर, नितीन गुंजाळ, प्रदिप राळे, निखील वर्पे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि विक्रम गायकवाड हे करीत आहेत.