पुणे येथे महा आवास योजना ग्रामीण जिल्हास्तर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पुणे येथे महा आवास योजना ग्रामीण जिल्हास्तर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

खेड पंचायत समिती चा राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण मध्ये प्रथम क्रमांक तसेच पंतप्रधान आवास योजना ग्रामीण मध्ये द्वितीय क्रमांक

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण

पुणे येथे महा आवास योजना ग्रामीण जिल्हास्तर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला ,त्या प्रसंगी मा.ना अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच मा.निर्मलाताई पानसरे अध्यक्षा जिल्हा परिषद पुणे, मा.दिलीपराव मोहिते आमदार खेड ,मा.सौरभ राव ,विभागीय आयुक्त पुणे, मा.राजेश देशमुख – जिल्हाधिकारी पुणे,मुख्यकार्यकारी अधिकारी मा.आयुष प्रसाद तसेच सर्व विभाग सभापती जि. प, यांच्या हस्ते खेड पंचायत समिती चा राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण मध्ये प्रथम क्रमांक तसेच पंतप्रधान आवास योजना ग्रामीण मध्ये द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले , सन्मान स्वीकारताना नवनिर्वाचित सभापती मा.अरुणभाऊ चौधरी , माजी युवा सभापती मा. अंकुशभाऊ राक्षे , गटविकास अधिकारी अजय जोशी, बाळासाहेब ढवळे, ससाणे मॅडम, सरपंच वाशेरे,सरपंच भोमाळे ग्रामविकास अधिकारी रणपिसे,आदर्श ग्रामसेवक पांडे भाऊसाहेब उपस्थित होते .