पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची वेताळे ता.खेड येथील फोट्रीन ट्री फाऊंडेशनला भेट.

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची वेताळे ता.खेड येथील फोट्रीन ट्री फाऊंडेशनला भेट.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

हरीत खेड तालुका या उपक्रमाअंतर्गत पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सर्व वरीष्ठ अधिकार्‍यांसह वेताळे ता.खेड येथील फोट्रीन ट्री फाऊंडेशन या संस्थेला भेट देवून,या हरीत उपक्रमाचे कौतूक केले.
त्यांच्यासमवेत जिल्हाअधिकारी राजेश देशमुख,जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद,सामाजिक वनिकरन पुणे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे,उपजिल्हाधिकारी संजय तेली,खेड उपविभागिय अधिकारी विक्रांत चव्हाण,तहसीलदार वैशाली वाघमारे,जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक,जिल्हा परिषद पुणे अध्यक्षा निर्मलाताई पानसरे,गटविकास अधिकारी अजय जोशी,उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,प्रकल्प अधिकारी घोडेगाव आदीवासी विकास विभाग,फोट्रीन ट्री फाऊंडेशन पुणे चे अजय भागवत,सेवा प्रतिष्ठानचे के.डी.गारगोटे(CA) यासह
कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.फोट्रीन ट्री फाऊंडेशन या संस्थेने डोगंराळ भागात वृक्ष लावून नंदनवन केले आहे.परिसरातील असंख्य गावात वृक्ष लागवड केली आहे.या सर्व कामाचे कौतूक सर्व वरीष्ठ अधिकार्‍यांनी केले आहे.या संस्थेच्या माध्यमातून वृक्षलागवडीची मोठी चळवळ उभी रहावी अश्या सर्वानी शुभेच्छा दिल्या.