पैलवान सिकंदर शेख ठरला खेड आमदार केसरी चा मानकरी.

पैलवान सिकंदर शेख ठरला खेड आमदार केसरी चा मानकरी.

चाकण प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

चाकण : महात्मा फुले मार्केट यार्ड येथे खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांचे लहान व मोठ्या गटातील नामांकित पैलवान निमंत्रित केले होते. यावेळी राज्यातुन नामांकित कुस्ती शौकीन स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होते.

कुस्ती शौकिनांना नामांकित कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी आखाड्याच्या तीनही बाजूने भव्य गॅलरी उभारण्यात आली होती. तसेच मातीचा आखाडा मोठ्या मेहनतीने तयार केला होता. यामुळे भव्य स्टेडियमचे स्वरूप प्राप्त झाले होते. विविध कुस्तीगिरांनी प्रेक्षणीय कुस्त्या करत प्रेक्षकांची मने जिंकली यामध्ये शेवटच्या दोन कुस्त्यांमध्ये मोतीबाग तालीम कोल्हापुर चा पैलवान उपमहाराष्ट्र केसरी पै नंदू आबदार ला अस्मान दाखवत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल चार पैलवान महेंद्र गायकवाड विजयी झाला.

अंतिम कुस्तीत आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल चा पैलवान महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षद सदगीर विरुद्ध गंगावेस तालीम कोल्हापूर चा पैलवान सिकंदर शेख यांच्या चुरशीच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीरला पायाला दुखापत झाल्याने त्याने कुस्तीतून माघार घेतली यामुळे आमदार केसरी गदे चा मानकरी पैलवान सिकंदर शेख हा ठरला.

यावेळी आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. प्राप्त प्रसंगी आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांनी बोलताना मी कुस्तीगीर संघाचा तालुकाध्यक्ष असून नेहमीच पैलवानांना न्याय देण्याचे काम केले आहे. व पुढील काळात ही करणार असल्याचे सांगितले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत कार्यकर्त्यांना बळ देण्याचे यावेळी आश्वासन दीले.

या स्पर्धेचे आयोजन कार्याध्यक्ष रा काॅ पा खेड तालुका मनोज दादा खांडेभराड, उपाध्यक्ष रा काॅ पा पुणे जिल्हा गणेश शेट बोत्रे, मा सरपंच जिवन शेठ खराबी, उद्योजक अनिकेत खालकर, मा सरपंच विजय शिंदे, खेड तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान अनिल साबळे यांनी केले.