प्रत्येक गावामध्ये देवीदास सपाट सारखा उच्चशिक्षित व सामाजीक जाण असणारा युवक हवा!!

प्रत्येक गावामध्ये देवीदास सपाट सारखा उच्चशिक्षित व सामाजीक जाण असणारा युवक हवा!!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

आपल्या गावचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि
आपल्यातल्या उपयोगी मूल्याचा गावाला उपयोग झाला पाहिजे, या विचारांप्रमाणे देवीदास सपाट या उच्चशिक्षित युवकाने काही मूल्यांचा उपयोग गावाला करुन देण्यासाठी मागील 5-6 वर्षापासून गावातील काही सहकारी मित्र आणि आप्तेष्टांच्या मदतीने प्रयत्न केला आहे.

सामाजिक कामाच वेड हे रक्तातच असाव लागत!एवढा उच्चशिक्षित व टाटा आॅटोकॅम्प हेंड्रिक्सन सारख्या नामांकीत कंपनीत उच्च पदावर अधिकारी असणारा हा युवक कमान गावासाठी अभिमानास्पद आहे.त्याला गावातील राजकारणाच काही देण घेण नाही.जे काही करायच आहे ते सर्व निरपेक्ष भावनेने व समाजाच्या उत्कर्षासाठी करायच आहे.आतापर्यंत या युवकाने जवळपास दिड कोटीची विकास कामे व अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

सन 2016 पासून सुरू केलेला हा सामाजिक विकासाचा प्रवास आजही सुरू आहे.

“गरीब कुटुंबासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड, अंगणवाडी इमारत, लहान मुलांसाठी खेळणी, शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, गणवेश वाटप, मुलांसाठी शाळेची बॅग आणि संपूर्ण किट वाटप, गावातील पिण्याच्या पाण्यासाठी सोलर एनर्जी आणि 27.5 hp मोटर प्रकल्प, पाझर तलाव नूतनीकरण, साकव पूल, 150 – 200 मीटर कच्चा रस्ता, अंगणवाडी सुशोभीकरण, गावातील काही अनाथा
मुलांस 18 व्या वर्षापर्यंत शैक्षणिक आणि आर्थिक सहकार्य अशी अनेक कामे मागील 5 वर्षात पूर्णत्वास नेण्यास यश आले आहे.

कुठलेही राजकीय पाठबळ नसताना फक्त तीव्र इच्छाशक्ती आणि काही जवळच्या मित्र परिवार यांच्या सहकार्याने आज ही कामे पूर्णत्वास नेण्यास यश आले. यापुढेही देवीदास सपाट या मिञाकडून कमान गावच्या सामाजिक विकासास हातभार लाभावा याच सदिच्छा व शुभेच्छा!!