प्रामाणिक पणे काम करणा-या शिक्षकांमुळेच जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावला.-बाबाजीशेठ काळे जि.प.सदस्य.

प्रामाणिक पणे काम करणा-या शिक्षकांमुळेच जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावला.-बाबाजीशेठ काळे जि.प.सदस्य.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

चासकमान (ता खेड)
पुणे जिल्हा परिषदेच्या काळूस गटातील जिल्हा परिषद सदस्य बाबाजीशेठ काळे यांनी जिल्हा परिषदेच्या बारापाटी कमान शाळा येथे सदिच्छा भेट देऊन शैक्षणिक उपक्रम व गुणवत्ता विषयक उपक्रमांची माहिती घेतली.
याप्रसंगी बारापाटी शाळेला आपल्या वैयक्तिक पातळीवर शक्य तितकी वस्तुरूप मदत करण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.
अथक परिश्रम घेऊन खूप कमी कालावधीत विविध उपक्रम राबवून शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत विशेष सुधारणा घडवून आणणारे शाळेचे मुख्याध्यापक आणि पुणे जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक संजय नाईकरे व त्यांच्या सहकारी शिक्षिका वैशाली नाईकरे यांनी बारापाटी शाळेचा केलेला कायापालट निश्चितच कौतुकास्पद आहे.
या शाळेतील विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी या प्रसंगी त्यांनी वैयक्तिक स्वरूपात सुद्धा एक लक्ष रुपयांची आर्थिक मदत शाळेसाठी जाहीर केली.
शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह, संघर्ष गाथा पुस्तक,
*विशेष सन्मानाची कृतज्ञता पाटी* देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या सदिच्छा भेट प्रसंगी कमान ग्रामपंचायत सदस्या सौ.अश्विनीताई नाईकरे युवा उद्योजक निलेश घेवडे,राजेंद्र मराडे,
दै.सकाळ चे जेष्ठ पत्रकार राजेंद्र लोथे मच्छिंद्र नाईकरे जेष्ठ नागरिक शंकरराव नाईकरे ज्ञानेश्वर नाईकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन केशवराव नाईकरे यांनी केले.