फोर्टिन ट्रिज संस्था व आखरवाडी ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने आखरवाडी येथे वृक्षारोपण

फोर्टिन ट्रिज संस्था व आखरवाडी ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने आखरवाडी येथे वृक्षारोपण

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

फोर्टिन ट्रिज संस्था व आखरवाडी ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने आखरवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. या संस्थेतर्फे आखरवाडी ग्रामपंचायत परिसर व गायरान मध्ये सुमारे 2500 रोपांची लागवड करण्यात येणार असून सदर वृक्षारोपणाचा शुभारंभ पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. निर्मलाताई सुखदेव पानसरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सौ. निर्मलाताई पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विनायक शेठ घुमटकर, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन खात्याचे माजी सभापती अरुण शेठ चांभारे,शहर अध्यक्ष सुभाष होले, राष्ट्रवादी लिगल सेल तालुका अध्यक्ष अॅड अरुण मुळूक,अॅड.सुखदेव तात्या पानसरे, आखरवाडी गावचे सरपंच सौ मोनिका मुळूक, कमान चे सरपंच योगेश नाईकरे, सौ कांचन ताई ढमाले, प्रताप ढमाले, अॅड मनीषा टाकळकर, सुजाताताई पचपिंड, उपसरपंच विठ्ठल मुळूक, ग्रामपंचायत सदस्य नीलम मुळूक, दिपाली मुळूक, ग्रामसेवक दौंडकर मॅडम, गणपत मुळूक, जालिंदर मुळूक, सुरेश मुळूक, वासुदेव मुळुक, दिगंबर मुळूक, बबन रणपिसे, अमर मुळूक, स्वप्निल मुळूक, साईनाथ मुळूक, आयुष्य मुळूक, ग्रामपंचायत कर्मचारी वैशाली मुळूक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते