बजाज कंपनी व जिल्हा परिषद पुणे यांच्यावतीने मोहकल येथे कोव्हीड लसीकरणाला चांगला प्रतिसाद

बजाज कंपनी व जिल्हा परिषद पुणे यांच्यावतीने मोहकल येथे कोव्हीड लसीकरणाला चांगला प्रतिसाद

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

बजाज ग्रुपच्या सौजन्याने व मा. आयुष प्रसाद (मुख्याधिकारी जिल्हा परिषद पुणे) जिल्हा परिषद अध्यक्षा मा. निर्मलाताई पानसरे, डॉ भगवान पवार यांच्या विशेष प्रयत्नाने उपलब्ध झालेल्या कोविशिल्ड लसीचे सुपर फास्ट महा लसीकरण मोहिम प्रा आ केंद्र वाडा अंतर्गत उपकेंद्र कमान अंतर्गत ग्रामपंचायत मोहकल येथे बजाज लसीकरण ३१/८/२०२१ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत कोविड-१९ लसीकरण १८ वर्षा वरील सर्व नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना दुसरा डोस असे एकंदरीत २०० नगरीकांचे लसीकरण करणेत आले. नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत लसीकरण करून घेतले.
या मोहिमेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा आ केंद्र वाडा येथील डॉ निखिल अडकमोल, उपकेंद्र कमान चे डॉ अश्विनी ढोले मॅडम आरोग्य सेविका दौंडकर व्ही एल अशा वर्कर अनिता राऊत, मनीषा रणपिसे यांचे मार्गर्शनाखाली पूर्ण झाले.मोहकल गावचे सरपंच सौ अश्विनी मारुती भागवत, उप सरपंच नवनाथ भगवंत राऊत , ग्रामसेवक वाव्हळ मॅडम, सदस्य नितीन राऊत, मंदा थोरात, दत्तात्रय राऊत, शशिकला रणपिसे. ग्रामस्थ रमेश राऊत, संतोष राऊत, रोहिदास रणपिसे, आदी उपस्थित होते. ऑनलाईन पद्धतीसाठी योगेश राऊत, सौरभ राऊत शेखर रणपिसे यांनी मदत केली. कर्मचारी सुखदेव रणपिसे, ग्रामस्थ कळूराम वाळुंज हे उपस्थित होते.