बळी..एकअंधश्रद्धा…. जागतिक क्रमवारीत द्वितीय पारितोषिक.खेड तालुक्यासाठी अभिमानाची बाब!

बळी..एकअंधश्रद्धा…. जागतिक क्रमवारीत द्वितीय पारितोषिक.खेड तालुक्यासाठी अभिमानाची बाब!

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

फिल्म.बळी. एक अंध श्रद्धा. हि एक अंध श्रद्धा वर आधारीत शॉर्ट फिल्म आहे.. या मधे समाजा मध्ये जी बळी द्यायची अंध श्रद्धा आहे. लोक अनेक वाईट गोष्टींवर वर विश्वास ठेवतात. असाच एक संदेश या शॉर्ट फिल्म मध्ये दाखवण्यात आलेला आहे.. मुल होण्यासाठी आपल्याच मुलीचा बळी दिला जातो, ते पण एका मित्राचे संगणेवरून… असे या फिल्म मध्ये दाखवण्यात आलेले आहे.
शॉर्ट फिल्म.. शूटिंग पूर्ण हे आदिवासी भागात.. नायफड, धबेवडी, पोखरी, या भागात केलेले आहे, यात सर्वच कलाकार आदिवासी भागात राहणारे आहेत..
फिल्म चे कथा. लेखन.सामाजिक कार्यात सक्रीय असणारे संजय दाभाडे यांनी केले आहे. दिग्दर्शक प्रतिक तिटकारे व फिल्म अभिनेते दत्ता तिटकारे, मकरंद पोरे यांनी केले आहे.या शॉर्ट मधील कलाकार.. प्रतिक तिटकारे,दत्ता तिटकारे, ज्ञानेश्वर तिटकारे,पुजा तिटकारे, स्वराली तिटकारे, सोनाली जाधव ,पर्वती बांगर,चिन्मय पोतदार यांनी अभिनय केलेला आहे.
रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल यांनी औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात या शॉर्ट फिल्मने जागतिक स्पर्धेत बेस्ट सोसिएल शॉर्ट फिल्म म्हणून दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.