बारापाटी कमान शाळेच्या गुणवत्तेवर जिल्हा परिषदेचे शिक्कामोर्तब संजय नाईकरे यांना जिल्हा स्तरावरील मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार…

बारापाटी कमान शाळेच्या गुणवत्तेवर जिल्हा परिषदेचे शिक्कामोर्तब संजय नाईकरे यांना जिल्हा स्तरावरील मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार…

राजगुरुनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी कमान शाळेच्या गुणवत्तेवर पुणे जिल्हा परिषदेच्या
गुणवंत शिक्षक पुरस्काराची मोहोर उमटवली गेली आहे.या शाळेच्या प्रगती चा उंचावणारा आलेख संपूर्ण खेड तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात लक्षवेधी ठरला असून नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांतील सातत्य राखत शाळा प्रमुख संजय नाईकरे यांनी अथक परिश्रमाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत उल्लेखनीय बदल घडवून आणला आहे.याच शाळेच्या सहशिक्षिका वैशाली मुके यांना ही तालुक्याच्या स्तरावरील गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला असून
खेड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने आज
बारापाटी कमान शाळेच्या या दोन्ही गुणवंत शिक्षकांना स्मृती चिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे हे दुहेरी यश नाईकरे दांपत्याने आपल्या शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना समर्पित केले आहे.शाळेप्रती आत्मीयता, विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा व विद्यार्थ्यांसमवेत होणारा मुक्त संवाद याद्वारे विद्यार्थ्यांच्या सवयी व वर्तनात या शिक्षकांनी अमुलाग्र बदल घडवून आणला.गणित इंग्रजी व पाढे पाठांतरात दमदार कामगिरी उभी करीत विद्यार्थ्यांचे पन्नास पर्यंत पाढे पाठांतर करून घेतले आहे.शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी मिळून या शाळेमध्ये एक दिवस आनंदाचा असे नाविन्यपूर्ण व दिशादर्शक विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला गोड जेवण देत विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना मनात शिक्षण व शाळेविषयी गोडी निर्माण केली.व विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अनुपस्थितीचे प्रमाण शून्यावर आणले आहे.या शाळेने दोन वर्षांत शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात दमदार व लक्षवेधी कामगिरी करीत संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात देखील आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसठशीत ठसा उमटवला आहे.खांडगे लान्स
आज खेड तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे व पंचायत समिती चे सभापती अरुण चौधरी यांच्या हस्ते बारापाटी शाळेच्या या दोन्ही गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून खेड तालुक्याचे आमदार दिलीप शेठ मोहिते यांनी संबोधित केले.गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे व केंद्र प्रमुख एकनाथ लांघी यांनी ही नाईकरे दांपत्याचे अभिनंदन केले आहे.