बारापाटी कमान शाळेच्या वतीने राष्ट्रीय शेतकरी दिनी कष्टकरी शेतक-यांचा सन्मान…

बारापाटी कमान शाळेच्या वतीने राष्ट्रीय शेतकरी दिनी कष्टकरी शेतक-यांचा सन्मान…

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

 

माझा बाप शेतकरी,
उभ्या जगाचा पोशिंदा…
त्याच्या भाळी लिहिलेला,
रात्रंदिवस कामधंदा…
शेतक-यांच्या कष्टमय जीवनाची आपल्या समाजाला यथार्थ जाणीव करून देणारा आजचा राष्ट्रीय शेतकरी दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी या संस्कारक्षम शाळेत साजरा करण्यात आला.या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने आजचा राष्ट्रीय शेतकरी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.या प्रसंगी बारापाटी कमान येथील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत सत्तर वर्षीय वयाचे श्री गोविंदराव नाईकरे या कष्टाळू शेतक-याचा बिस्किटे व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.शाळेतील शिक्षकांनी शेतकरी बांधवांच्या जीवनातील व्यथा, समस्या व अडी-अडचणींबाबत
विद्यार्थ्यांना अवगत केले.या प्रसंगी पुणे येथील सेंद्रिय शेती चे पुरस्कर्ते व सिव्हिल इंजिनिअरची नोकरी सोडून सेंद्रिय शेतीचे पूर्ण वेळ काम करणारे भूषण पाटील यांनी विद्यार्थ्यांशी शेतीविषयक प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मुक्त संवाद साधला व सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी भूषण पाटील यांना संघर्ष यशोगाथा पुस्तक देऊन सन्मानित केले.सहशिक्षिका वैशाली मुके यांनी आभार मानले.