बैलगाडा शर्यती लवकर सुरू करण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तमजी रुपाला यांची खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी घेतली भेट.

बैलगाडा शर्यती लवकर सुरू करण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तमजी रुपाला यांची खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी घेतली भेट.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

महाराष्ट्राच्या ग्रामिण संस्कृतीचा महत्वपूर्ण ठेवा असणाऱ्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु व्हाव्या यासाठी बैल या प्राण्यास संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे अशी मागणी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तमजी रुपाला यांच्याकडे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी केली.

बैल या प्राण्याचा संरक्षित दर्जा काढून घेण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यावेळी बैलगाडा शर्यतीबाबत श्री रुपाला जी यांना माहिती दिली. यासोबत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी बैलांची कशी काळजी घेतात हे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्र्यांना व्हिडिओद्वारे समजावून सांगितले.

मागील अधिवेशनात तत्कालिन केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सह-सचिवांसमवेत बैठक आयोजित करुन एक पाऊल पुढे टाकले होते. आता विद्यमान पशुसंवर्धनमंत्री देखील या विषयी सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.