ब्रेकींग न्युज! खेड तालुक्यातील कळमोडी धरण ओव्हर फ्लो!

ब्रेकींग न्युज!
खेड तालुक्यातील कळमोडी धरण ओव्हर फ्लो!

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

बुधवार दि.२१ रोजी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे पुणे जिल्हयातील खेड तालुक्यातील कळमोडी धरण पुर्ण क्षमतेने भरून,सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.धरणाच्या सांडव्यावरून आरळा नदि पाञात तीन हजार क्युसेक्स वेगाने पाणी पडत आहे.हे पाणी चासकमान धरणाला जावून मिळत असल्यामुळे चासकमान धरणाच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होणार आहे.आरळा नदि काठील नागरिकांना जलसंपदा विभागामार्फत खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत.