भंडारदरा धरणातुन पाणी सोडले.सुंदर दिसणारा आंब्रेला फाॅल!

भंडारदरा धरणातुन पाणी सोडले.सुंदर दिसणारा आंब्रेला फाॅल!

दशरथ खाडे.

प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

 

भंडारदरा ता.अकोले परिसरात गेल्या आठवडा भरपासुन मुसळधार पाऊस सुरु असुन भात लावणीच्या कामाला वेग आला आहे.
धरण साठयात सातत्याने मुतखेल,कोलटेंभे,रतनवाडी,साम्रद,घाटघर,
मुरशेत परिसरात व भंडारदरा परिसरात सध्या पाऊस भरपुर प्रमाणात सुरु असुन धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.
पाऊस सुरु झाल्यापासुन येणा-या पर्यटकांची संख्या वाढली आहे.शिवाय धरणातुन देखील पाणी सोडल्याने व परिसर हिरवाईने नटला असल्याने डोंगररांगा सौंदर्याने खुलल्या आहेत.धबधबे देखील वाहु लागले आहेत.