भगवान श्रीकृष्णाचे चरित्र प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देण्याचं काम करते.

भगवान श्रीकृष्णाचे चरित्र प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देण्याचं काम करते.

वाडा (ता.खेड) येथील सदगुरु गोविंद बाबा बोर्‍हाडे यांची पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह संपन्न झाला. सदगुरु वै.ह.भ.प गोविंद बाबा बोर्‍हाडे यांनी स्थापन केलेल्या ‘जय जय धनुर्धर गोविंद सदगुरु सेवा मंडळ योगाश्रम व अध्यात्मिक ज्ञान प्रसारक केंद्र वाडा, येथे हा सप्ताह संपन्न झाला. सप्ताहचे हे पंधरावे वर्ष होते, गोविंद बाबांच्या पुण्यतिथी निमीत्त सकाळी ९ वा विणा पुजन, १० ते १२ या वेळेत ह.भ.प.बाळशिराम महाराज मिंडे (कोहींडे) यांचे किर्तन झाले, संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत ह.भ.प.किशोर महाराज बांगर (चिखलगाव) यांचे किर्तन झाले, ह.भ.प .सागर महाराज शिर्के याच्यां काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली,या वर्षी कोरोणा १९ च्या प्रार्दुभावामुळे सप्ताह दोन दिवसाचा करण्यात आला,
ह.भ.प.सागर महाराज शिर्के (आळंदी) हे काल्याचे कीर्तन सेवेत बोलताना भगवान श्रीकृष्णाचे चरित्र प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देण्याचं काम करतो आयुष्य सुखावह होण्यासाठी आयुष्य सुंदर बनण्यासाठी आणि आयुष्य समाधानाने जगण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची गरज संपूर्ण मानव जातीला आहे. संपूर्ण समाज जातीकडे मानवाकडे भगवत दृष्टीने पाहाणं ही सर्व रूप एकच आहेत ती भगवान परमात्म्याचे आहेत अशी वृत्ती अंतकरणात निर्माण करणं हाच खरा काला आहे असे प्रतिपादन ह.भ.प.सागर महाराज शिर्के (आळंदी) यांनी केले.
अखंड हरिनाम सप्ताहाने परिसर भक्तिमय झाला होता. सदरचा सर्व कार्यक्रम शासनाचे कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच लोकांचे व बाबांचे शिष्यांचे उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी माजी सभापती काळुराम सुपे, कृषी उ. सभापती धारू गवारी, उद्योजक संजयभाऊ घनवट, वाडा गावचे उपसरपंच गणेश लांडगे, उद्योजक शिवाजी मोरे, ग्रा.प.सदस्य किरण हुंडारे, देवराम शेटे, गोरक्षनाथ हुंडारे, गजानन हुंडारे, उद्योजक पोपट पावडे, संतोष पावडे, सचिन बोर्‍हाडे, दत्ताशेट बोर्‍हाडे, दत्तात्रय मोरे, ह.भ.प शांताराम महाराज मोरे, उपाध्यक्ष शांताराम महाराज गाढवे, मृदुंगाचार्य अमोल कदम, भाऊ पावडे, पंढरीनाथ पावडे, माऊली पावडे हे मान्यवर उपस्थित होते, पुणे जि,दुध संघाचे संचालक शेखरभाऊ शेटे यांनी या प्रसंगी भेट दिली, जय जय धनुर्धर गोविंद सदगुरु सेवा मंडळाच्या वतीने ह.भ.प सिताराम बाबा बोर्‍हाडे यांनी क्रार्यक्रमाचे नियोजन केले गेले होते.