भोमाळे वरचे ता खेड येथे रानभाज्या महोत्सवाला उस्फुर्त सहभाग.

भोमाळे वरचे ता खेड येथे रानभाज्या महोत्सवाला उस्फुर्त सहभाग.

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

राजगुरूनगर, दि. १०(प्रतिनिधी): कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत भोमाळे वरचे ता खेड येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १० प्रकारच्या रानभाज्या ६ बचतगटांनी सहभाग घेतला.

              कृषी विभागाच्या वतीने आत्मा योजनेंतर्गत रानभाज्या महोत्सव सप्ताह ९ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट या काळात आयोजन करण्यात आले आहे. रानभाज्याचे संवर्धन करण्यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. या योजने अंतर्गत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन राज्यभर करण्यात येत आहे.

              भोमाळे वरचे ता खेड आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उदघाटन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्या हस्ते झाले यावेळी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, मंडल कृषी अधिकारी नंदू वाणी, कृषी पर्यवेक्षक रामचंद्र बारवे, कृषी सहाय्यक संतोष रोडे,दिगंबर नाईकरे,मधुकर लाडके, दिगंबर डोलारे, भोमाळेचे सरपंच सुधीर भोमाळे, सदस्य निवृत्ती भोमाळे, भिवेगाव बचत गटाच्या पार्वताबाई वनघरे, भोमाळे बचत गटाच्या हौसाबाई धुमाळ, कोंडाबाई भोमाळे, भोरगिरी बचत गटाच्या मंदा काठे,यांच्यासह परिसरातील बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

            विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार म्हणाले, रानभाज्या दुर्मिळ होत चालल्या आहेत त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगावर जंगलात पिकणाऱ्या रानभाज्यांना चांगली बाजारपेठ निर्माण करून त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पिकेल ते विकेल या उपक्रमातून जवळपासच्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. शेतीमध्ये लागवड व तंत्रज्ञान याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

         तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे म्हणाले, रानभाज्यांचे औषधी गुणधर्म व त्याच्या पाककृती संदर्भात महिलांशी संवाद साधला. मंदा काठे यांनी रानभाज्याची ओळख व माहिती दिली.महिला बचत गट व कल्पवृक्ष संस्था यांनी रानभाज्यावर आधारित माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहाय्यक संतोष रोडे, दिगंबर नाईकरे यांनी केले.प्रास्ताविक, सूत्रसंचालन मंडलकृषी अधिकारी नंदू वाणी यांनी केले,