महाराष्ट्र पोलीस खात्यातील एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहीलेच अधिकारी संभाजी गुरव यांचा गृहमंञी दिलीप वळसे यांच्याकडून सत्कार

  • महाराष्ट्र पोलीस खात्यातील एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहीलेच अधिकारी संभाजी गुरव यांचा गृहमंञी दिलीप वळसे यांच्याकडून सत्कार

प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

पोलिस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वोच्च पर्वत शिखर माउंट एव्हरेस्टला गवसणी घातली. महाराष्ट्र पोलिस खात्यातील एव्हरेस्ट शिखर सर करणारे ते पहिलेच अधिकारी ठरले. या उत्तुंग कामगिरीबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजी गुरव यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले.

संभाजी गुरव यांनी २३ मे रोजी एव्हरेस्ट शिखर सर केले होते. माउंट एव्हरेस्टसोबतच जगातील इतर शिखरही सर करण्याचा गुरव यांचा दृढनिश्चय आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या मोहिमेला गृहमंत्र्यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.