महाळुंगे म्हाडा येथे १०० ऑक्सिजन बेड कोव्हीड सेंटर लवकरच उभे राहणार-मा.सभापती अंकुश राक्षे.

  1. *महाळुंगे म्हाडा येथे १०० ऑक्सिजन बेड कोव्हीड सेंटर लवकरच उभे राहणार-मा.सभापती अंकुश राक्षे.
    ऑक्सिजन लाईन चे काम प्रगतपथावर सुरू .. फॅन लाईट चे काम झाले आहे , बेड्स देखील प्राप्त आहेत , मॉनिटर व इतर साहित्य देखील उपलब्ध झाले आहे .. माननीय मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शाखाली ..congnizant कंपनी च्या सीएसआर फंडस व पंचायत समिती आरोग्य विभागाच्या माध्यमातून हे रुग्णालय सुरू होणार आहे ..
    आज चालू असलेल्या कामाची पाहणी करताना .. ह्या करिता सतत पाठपुरावा करणारे मा. सभापती अंकुश राक्षे तसेच उपसभापती चांगदेव शिवेकार,डॉ.रॉली म्हात्रे, अपेक्षा बोरकर, डॉ.श्रावणी,डॉ.लखन,डॉ.इशिमा उपस्थित होते ..
    सदर रुग्णालय हे मोफत सेवा देणार आहे ..आणि लवकरच राजगुरुनगर ला देखील असेच १०० बेड चे रुग्णालय उभे करण्याचा प्रयत्न आहे ..