माझ्या गटातील प्रत्येक गावामध्ये विकासकामे करता आली हे मी माझे भाग्य समजते-तनुजाताई घनवट

माझ्या गटातील प्रत्येक गावामध्ये विकासकामे करता आली हे मी माझे भाग्य समजते-तनुजाताई घनवट

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

माझ्या गटातील प्रत्येक गावामध्ये विकासकामे करता आली हे मी माझे भाग्य समजते.एक महिला असूनही घरच्यांच्या भक्कम पाठींब्यामुळे व जनतेच्या पाठबळामुळे वाडा कडूस गटातील जनतेची सेवा करता आली.असे मत मिरजेवाडी-घनवटवाडी येथील विविध विकासकामांचे भुमीपुजन कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या तनुजा संदिप घनवट यांनी व्यक्त केले.
उपतालुका प्रमुख संजयशेठ घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा-कडूस गटातील मिरजेवाडी-घनवटवाडी येथे विवीध विकास कामांसाठी ५९.५ लक्ष रूपयाचा निधी प्राप्त झाला असून,या कामांचे भुमीपुजन जि.प.सदस्या तनुजाताई घनवट यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच बाळासाहेब बुट्टे,उपसरपंच राजश्री घनवट,माजी उपसरपंच संजय घनवट,योगेश बुट्टे,सदस्य दताञय वाळुंज,ज्योती जाधव,शुभांगी घनवट यासह रामदास घनवट,संजय घनवट,अरूण बुट्टे,बबुशा घनवट,पप्पुशेठ ढमढेरे,किसन घनवट,अनिल घनवट,शिवाजी घनवट,विलास पोखरकर,गणेश जाधव,बाळासाहेब घनवट,गोटीराम मगर,संतोष चव्हाण,जितेंद्र घनवट,सुनिल घनवट,प्रकाश घनवट,शिवाजी औटी हे उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना संतोष घनवट यांनी केली.आभार अजित घनवट यांनी मानले.