मानव अधिकार महासंघ यांची मुक्काम पोस्ट दिवळी, ता.महाबळेश्वर येथे पुरग्रस्थांना मदत.

मानव अधिकार महासंघ यांची मुक्काम पोस्ट दिवळी, ता.महाबळेश्वर येथे पुरग्रस्थांना मदत.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

मुक्काम पोस्ट दिवळी, ता.महाबळेश्वर, जिल्हा सातारा हे गाव तसं नकाशात सापडणारही नाही इतकं चिमुकलं ! सह्याद्रीच्या डोंगरात लपलेलं ! पण या महापुराने त्या गावाची पुरती वाताहात करून टाकली. रस्तेच काय, शेतीही वाहून गेली. पिढ्यान पिढ्या ज्या जमिनीच्या भातावर पोसल्या ती मातीच वाहून गेली आणि उरले ते दगड-गोटे !
मानव अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने, त्या भागात कार्यरत असणारे श्री.प्रशांत डोंगरे आणि संतोष जाधव व दिवळी गावचे सरपंच विठ्ठल जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही त्या गावातील कुटुंबाना कोरडा शिधा, साड्या, कपडे, इत्यादी मदत करून त्या गावकऱ्यांच्या संकटात त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
आम्ही केलेली मदत फार अपुरी आहे याची जाणीव आम्हाला आहे.
आभाळच फाटलंय, कुठं कुठं म्हणून ठिगळं लावणार ? तरीही त्या गावातील आया-बहिणींच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे भाव खूप खूप समाधान देऊन गेले !
या कार्यक्रमात मानव अधिकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब ताये. पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब गारगोटे.नगर जिल्हा संपर्क प्रमुख सोपानशेठ राक्षे. पुणे जिल्हा संघटिका संगीताताई नाईकरे. खेड तालुका सह समनवयक अविनाश देशमुख. खेड तालुका अध्यक्ष मंगलाताई राक्षे. खेड तालुका संघटिका तेजस्विनीताई देशमुख.राजगुरूनगर शहर सह संपर्क प्रमुख शितलताई राक्षे.चाकण शहर सचिव किशोरीताई देशमुख.आदी पदाधिकारी सहभागी होते.