राजगुरूनगर प्रतीनीधी -मा. सभापती अंकुशभाऊ राक्षे यांचे राजगुरुनगर सहकारी बँकेकडे 100 ऑक्सिजन बेड चे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी साकडे..
प्रशासन व आरोग्य विभाग तसेच खेड तालुक्यातील औद्योगिक नगरीतील कंपण्यांच्या सामाजिक दायित्व (CSR) निधी च्या सहकार्याने आपण सर्वजण मिळून सदरचे रुग्णालय उभे करू, असे मत अंकुश राक्षे यांनी व्यक्त केले.
मा. अध्यक्ष, उपाध्यक्ष साहेब यांच्या वतीने मा. अध्यक्ष किरणदादा आहेर तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. वाघचौरे साहेब यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदन देताना मा. सभापती अंकुश राक्षे, हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन चे संचालक अमर टाटीया, उद्योजक प्रसाद तनपुरे व गणेश बारणे उपस्थित होते.