मेदनकरवाडी येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने चाकूने गळ्यावर वार करून केला पत्नीचा खून

मेदनकरवाडी येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने चाकूने गळ्यावर वार करून केला पत्नीचा खून

चाकण प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

चाकण : मेदनकरवाडी गावात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची चाकूने गळ्यावर वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आश्विनी सचिन काळेल (वय २३) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून याप्रकरणी तिचा पती सचिन रंगनाथ काळेल (वय-३३) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना आज सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. मेदनकरवाडी गावातील आनंद हायट्स बिल्डिंगमध्ये मागील सहा महिन्यांपासून सातारा येथील आरोपी सचिन रंगनाथ काळेल (वय-३३) व त्याची पत्नी आश्विनी सचिन काळेल (वय २३) कुटुंब आपल्या मुलांसह राहत होते. आरोपी सचिन काळेल आपल्या पत्नीवर बाहेर कुठे तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत असल्याने त्यांच्यात भांडण होऊन १२ एप्रिल २०२२ रोजी पहाटे सचिन काळेत याने पत्नीचा गळ्यावर चाकूने वार करून निर्घृण खून केला. या घटनेनंतर आरोपी पती सचिन काळेल घडलेल्या घटनास्थळावरून फरार झाला असून गुन्हे शाखा युनिट ३ व चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस पथक आरोपीचा शोध घेत आहेत.

सध्या चाकण, महाळुगे परिसरात खुनाचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यावर पोलीस प्रशासनाने अंकुश ठेवण्याची मागणी आता नागरिकांच्या कडून जोर धरू लागली आहे. या घटनेवेळी घटनास्थळी गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक चांबले, पोलीस कॉन्स्टेबल राज हणमंते, सुर्यवंशी, दांगट, सानप आरोपीचा शोध घेत आहेत.