मोठ्या प्रमाणात केलेल्या विकासकामांबरोबरच,वैयक्तीक लाभाच्या योजना नागरिकापर्यंत पोहच केल्या-तनुजाताई घनवट.

मोठ्या प्रमाणात केलेल्या विकासकामांबरोबरच,वैयक्तीक लाभाच्या योजना नागरिकापर्यंत पोहच केल्या-तनुजाताई घनवट.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

वाडा कडूस गट हा ग्रामीण भागातील शेतीक्षेञा वर अवलंबून असलेला भाग आहे.या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे करता आली पण याबरोबरच जिल्हा परिषदेच्या वैयक्तीक लाभाच्या योजना महिला व शेतकरी वर्गाला मिळवून दिल्याचे समाधान मिळाले असे मत कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट यांनी कमान ता.खेड येथे कमान स्टॅन्ड ते बारापाटी रस्त्याच्या भुमिपुजन प्रसंगी व्यक्त केले.
या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेचा २१ लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला असून,काॅक्रीटीकरण रस्ता होणार आहे.
यावेळी कमानचे सरपंच योगेशशेठ नाईकरे,उपसरपंच मोनिका नाईकरे,ग्रामपंचायत सदस्य व राजगुरूनगर सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष सतिषशेठ नाईकरे,युवा सदस्य मच्छिंद्र रोकडे,युवा सदस्य अमोल नाईकरे,पुष्पा नाईकरे,सुनिता निर्मळ,इंदुमती नाईकरे,अश्विनी नाईकरे
यासह माजी आदर्श सरपंच अशोक नाईकरे,प्रगतशील शेतकरी संदिप नाईकरे,ऊदयोजक विकासशेठ नाईकरे,कृषीनिष्ठ पुरस्कार विजेते दिलीप नाईकरे,प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रविणशेठ नाईकरे,सेवानिवृत्त अधिकारी सुभाष नाईकरे,शंकरराव नाईकरे,निलेशशेठ नाईकरे,शुभम नाईकरे,गोविंद रोकडे,गुलाबराव नाईकरे,राजु निर्मळ,शंकरराव नाईकरे,मारूतीशेठ नाईकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.