यशोधन अनाथश्रमात मिळाला तीन निराधार व्यक्तींना आसरा..खेड पोलिस स्टेशन व
हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन चा पुढाकार!
राजगुरुनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.
चास पाईट आणि राजगुरुनगर परिसरात तीन बेवारस अवस्थेत फिरत असल्याचे हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे संस्थापक कैलास दुधाळे यांच्या निदर्शनास आले.
अन्न,वस्र, निवारा या
गोष्टी त्या तीन निराधार असलेलेल्या व्यक्तींना मिळत नसल्याने त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असल्याची खंत खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव यांना हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व्यक्ती केली. पोलिस निरिक्षक सतिश गुरव यांनी तात्काळ त्या तीन व्यक्तीची सविस्तर माहीती घेतली आणि साताऱ्यातील वाई तालुक्यामधील वेळे गावात असणाऱ्या यशोधन अनाथ आश्रमात संस्थापक श्री.रवि बोडके यांच्याकडे त्यांची सोय केली. या कामी हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनने सहकार्याची भुमीका दाखवली.
या सामाजिक कार्यात खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव
ठाणे अंमलदार संतोष घोलप संदीप भापकर
भारत भोसले यांचे सहकार्य मिळाले. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतुन हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशचे संस्थापक कैलास दुधाळे आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे नितिन सैद सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र पवळे उद्दोजक संदीप घनवट फाऊंडेशनचे संचालक राहुल मलघे दत्ता रुके अध्यक्षा ॲड.मनिषा पवळे नाजनीन शेख, संगिता तनपुरे दिलिप होले,सचिन वाळुंज संतोष सांडभोर, पिंटु गावडे, अमोल रासकर शेखर पवार, रवि पाचारणे, संजय नाईकरे सर जितु चव्हाण रामचंद जगदाळे आदी उपस्थित होते.