राजगुरुनगर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. देविदास युवराज शिंदे पाटील व सचिवपदी ॲड. संदीप गाडे

राजगुरुनगर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. देविदास युवराज शिंदे पाटील व सचिवपदी ॲड. संदीप गाडे

राजगुरुनगर प्रतिनीधी
मु.पो.ग्रामीण.

येथील सत्र न्यायालयात काम करणाऱ्या वकील सदस्यांच्या राजगुरुनगर बार असोसिएशन निवडणुकीत ॲड. देविदास युवराज शिंदे पाटील हे अध्यक्षपदी बहुमताने विजयी झाले. उपाध्यक्षपदी ॲड. गणेश गाडे व सचिवपदी ॲड. संदीप गाडे विजयी झाले. बुधवारी (दि. १) न्यायालयातील ग्रंथालयात ३४२ पैकी ३१८ वकीलांनी मतदान केले. रात्री मतमोजणी पार पडली. यापूर्वीच ॲड. रिना मंडलिक यांची महिला उपाध्यक्षपदी, सचिवपदी ॲड. संदीप मलघे, खजिनदारपदी ॲड. माणिक वायाळ तर ऍड. उज्वला माळी यांची लोकल ऑडिटरपदी बिनविरोध निवड झाली होती. निवडणुकीद्वारे ॲड. तिलोत्तमा साळुंके, ॲड. सोनाली कोकणे, ॲड. स्नेहल पवळे, ऍड. शुभम गाडगे यांची कार्यकरिणी सदस्यपदी निवड झाली.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. बाळकृष्ण सांडभोर व त्यांचे सहकारी ॲड. वैभव कर्वे, ॲड. मालिनी भागवत, ॲड. अमोल घुमटावर, ॲड. आतिक सय्यद, ॲड. आरती टाकळकर यांनी काम पाहिले.