राजगुरूनगरचे पञकार एकनाथ सांडभोर यांची खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांच्याकडे विनंतीपुर्वक मागणी.

राजगुरूनगरचे पञकार एकनाथ सांडभोर यांची खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांच्याकडे विनंतीपुर्वक मागणी.

आदरणीय खासदार
डॉ . अमोल कोल्हे साहेब ..

राजगुरुनगरला पुणे नाशिक बायपासचे काम सुरू आहे .भिमानदीवर मोठा नविन पुल होणार आहे . या पुलाच्या दोन्ही बाजूस मोठा भराव करावा लागणार आहे . या भरावासाठी खेड घाटातील डोंगर टेकडया फोडाव्या लागणार आहे . रस्ते वहातूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या अशा सुचना आहेत की, बायपास रस्त्याजवळून नदी जात असेल, ती उथळ झाली असेल तर या नदीतील जाड वाळू या भरावासाठी वापरावी . त्यामुळे नदीचे खोलीकरण होईल , पाणीसाठा वाढेल आणि नदी स्वच्छ होईल .
महोदय, राजगुरुनगरची भिमानदीचे पात्र अतिशय उथळ झाले आहे . त्यामध्ये गटरचे सांडपाणी जाऊन जलपर्णीची मोठी वाढ झाली आहे . भविष्यात पुराचे पाणी गावात शिरण्याचा धोका आहे . तरी कृपया केदारेश्वर ते सिध्देश्वर दरम्यानचा पात्रातील जाडारोडा पाच फुटापर्यंत खोल उचलून भरावासाठी वापरावा . हे काम झाले तर आपोआपच नदीचे सुशोभीकरण होईल . डोंगर वाचतील,वहातूक खर्च वाचेल . तरी कृपया आपण श्री . गडकरी साहेब व जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन ठेकेदाराला तसा त्यांनी आदेश द्यावा .
ही नम्र विनंती
एकनाथ सांडभोर पञकार राजगुरूनगर.