राजगुरूनगर न्यायालयात वकिलांसाठी कोरोना प्रतिबंधित लसीकरण कॅम्पची मागणी.

राजगुरूनगर न्यायालयात वकिलांसाठी कोरोना प्रतिबंधित लसीकरण कॅम्पची मागणी.

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

राजगुरूनगर न्यायालयात वकिलांसाठी कोरोना प्रतिबंधित लसीकरण कॅम्प आयोजित करावा यासाठी खेड तालुका वकील संघटनेच्या वतीने आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ गाढवे साहेब यांना भेटून निवेदन दिले लवकरच लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात येईल असे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.
यावेळी राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड संजय पानमंद, राष्ट्रवादी लीगल सेलचे खेड तालुका अध्यक्ष व खेड तालुका बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड अरुण मुळूक, राजगुरुनगर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड अतुलजी गोरडे, सचिव अॅड शीतल बडदे उपस्थित होते.