राजगुरूनगर येथे शिक्षक गुणवंतांचा कार्यक्रम दिमाखदारपणे सम्पन्न. राजगुरूनगर येथे शिक्षक गुणवंतांचा कार्यक्रम दिमाखदारपणे सम्पन्न.

राजगुरूनगर येथे शिक्षक गुणवंतांचा कार्यक्रम दिमाखदारपणे सम्पन्न. राजगुरूनगर येथे शिक्षक गुणवंतांचा कार्यक्रम दिमाखदारपणे सम्पन्न.


मधुकर गिलबिले यांच्या चैत्रपालवी कविता संग्रह ,टपाल तिकीट प्रकाशन सोहळा सम्पन्न

खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या वतीने आज दि .२६ फेब्रुवारी रोजी खेड तालुक्यातील शिष्यवृत्ती मार्गदर्शक गुणवंत शिक्षकांचा व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आमदार दिलीप मोहिते पाटील, सभापती भगवानशेठ पोखरकर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजीशेठ काळे,मा .सभापती अंकुश राक्षे,संजय नाईकडे गटशिक्षणाधिकारी ,पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा राज्य सरचिटणीस अनिल पलांडे,राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय वाघ,जिल्हा अध्यक्ष शांताराम नेहेरे ,उपाध्यक्ष विजय बेंडभर , संतोष नेटके,दत्तात्रय भलचिम, कल्याण पिंगळे,भाऊराव पांडे, तालुका अध्यक्ष नारायण करपे ,महिला आघाडी अध्यक्ष संजीवनी चिखले, यांच्या शुभहस्ते आज सम्पन्न झाला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा, महिला आघाडी यांच्या वतीने आयोजन केले गेले.
कवी शिक्षक मधुकर गिलबिले यांच्या चैत्रपालवी कविता संग्रहाचे तसेच भारतीय टपाल विभागाने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले.तसेच उर्दू शाळा शिक्षक अमजद शेख सर यांच्याही पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले.
शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांच्या वतीने कुरुळी शाळेच्या मायादेवी जाधव ,सुर्वे तसेच शिक्षक मधुकर गिलबिले यांनी मनोगत व्यक्त केले.
शैक्षणिक वर्ष २०२०/२१ मध्ये खेड पंचायत समिती अंतर्गत इ .५ वी, ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत मार्गदर्शन करून जिल्ह्यात खेड तालुका द्वितीय स्थानावर नेल्याबद्दल तालुक्यातील ५४ गुणवन्त शिक्षक तसेच विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या काही शिक्षकांचा यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला गेला.
आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांनी सर्वाना संबोधित केले. तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता ,शिष्यवृत्ती बाबत त्यांनी शिक्षकांचे कौतुक करून पुढील काळात स्पर्धेच्या युगात मुलांना नोकरी मिळणे कामी अधिकचे प्रयत्न करणे गरजेचे आहेत असे सांगितले.
या प्रसंगी पदवीधर प्राथमिक शिक्षक व गुणवन्त शिक्षक उपस्थित होते.
सूत्रसंचालन तुषार वाटेकर,कल्याणी रामाने,भीमराव पाटील ,वर्षाराणी वाटेकर यांनी केले.