राज्याच्या अर्थसंकल्पात शिरूर-खेड तालुक्यातील रस्त्यांसाठी २७ कोटी ८६ लाख रुपयांच्या कामांना मंजूरीस्थानिक आमदारांसोबत केलेल्या निरंतर पाठपुरावा आणि सामुहिक समन्वयाचे हे यश ; खा.डॉ.अमोल कोल्हे यांचे मत

 

राज्याच्या अर्थसंकल्पात शिरूर-खेड तालुक्यातील रस्त्यांसाठी २७ कोटी ८६ लाख रुपयांच्या कामांना मंजूरी
स्थानिक आमदारांसोबत केलेल्या निरंतर पाठपुरावा आणि सामुहिक समन्वयाचे हे यश ; खा.डॉ.अमोल कोल्हे यांचे मत
पुणे, दि.२७ (प्रतिनिधी )
राज्याच्या अर्थसंकल्पात शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर आणि खेड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे २७ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास अंतिम मंजूरी मिळाली आहे. माझ्यासमवेत शिरुर-हवेलीचे आमदार अॅड.अशोक बापू पवार आणि खेडचे आमदार श्री.दिलीप मोहिते पाटील यांनी केलेला निरंतर पाठपुरावा आणि सामुहिक समन्वयामुळे हे यश मिळाल्याचे मत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

गतवर्षी आलेल्या कोविड १९ संकटाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना पुरेसा निधी मिळावा यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी आमदार पवार आणि आमदार मोहिते पाटील यांच्याशी समन्वय साधून मोजकीच कामे सुचवली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी शिरुर तालुक्यातील रांजणगाव, कर्डे, शिंदोडी, शिरसगाव काटा, मांडवगण फराटा, तांदळी (प्रजिमा १००) रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कुरुळी, वडगाव रासाई, मांडवगण फराटा (प्रजिमा ५३) रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कुरुळी (प्रजिमा ५३) आंधळगाव, आलेगाव पागा ते प्रजिमा ३९ पर्यंतचा रस्ता (प्रजिमा १६०) रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, आरणगाव, आलेगाव पागा, नागरगाव, वडगाव, गणेगाव, तांदळी (प्रजिमा ४०) रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, रांजणगाव, कर्डे, शिंदोडी, शिरसगाव काटा, मांडवगण फराटा , तांदळी (प्रजिमा १००) रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या रस्त्यांच्या कामांसाठी रु. २४.२१ कोटी इतका निधी मंजूर केला. तर खेड तालुक्यातील पुणे, आळंदी, केंदूर, पाबळ, वाफगाव, पेठ रस्ता रामा १२९ रुंदीकरण व सुधारणा करणे, चास कडूस, किवळे, कोरेगाव, आंबेठाण रस्ता प्रजिमा १८ रुंदीकरण व सुधारणा करणे या रस्त्यांच्या कामांसाठी रु. ३ कोटी ६५ लक्ष ३८ हजार इतका निधी मंजूर केला.

खा.कोल्हे म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे मी प्रयत्न करत असताना आमदार अॅड. अशोक पवार आणि आमदार मोहिते पाटील यांनी दिलेली साथ मोलाची ठरली. तसेच पालकमंत्री अजितदादा पवार यांनी केलेले सहकार्य यामुळे जास्तीतजास्त निधी मिळविण्यात यशस्वी झालो आहोत. याच पद्धतीने आगामी काळात कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह सर्व आमदार एकत्रितपणे विकासासाठी प्रयत्न करुन राज्यसरकारकडून जास्तीतजास्त निधी शिरुर लोकसभा मतदारसंघात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
——————————————————