राज्यात सत्ता आघाडीची !मग खेड पंचायत समितीमध्ये बिघाडी का?वाट १८ तारखेची?

राज्यात सत्ता आघाडीची !मग खेड पंचायत समितीमध्ये बिघाडी का?वाट १८ तारखेची?

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समिती मुळे गेली दोन महिने राज्यात वादाचे पडसाद उमटले ते सभापती वरील अविश्वास ठरावामुळे यात महाविकास आघाडीमधील तीनही पक्षाच्या सदस्यांनी महत्वपुर्ण भुमिका बजावली आहे.पण येत्या १८ तारखेलाच कळणार आहे राज्यात सत्ता कोणाची असो खेड तालुक्यात महत्वपुर्ण भुमिका कोण बजावणार!यातूनच पुढे होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची गणिते ठरणार आहेत.

राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसनेतील वादामुळे राज्यभर गाजलेल्या खेड पंचायत समिती च्या शिवसेनेच्या सभापतीविरोधात विरोधी सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर  १८ ऑगस्‍ट राेजी  फेरमतदान घेण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार, दुसऱ्यांदा होणाऱ्या या मतदानाकडे तालुक्यातील नागरिकांचे तसेच राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात त्यांच्या पक्षातील सहा व राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे ५ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करून त्यावर ३१ मेला मतदान झाले होते.

या प्रक्रियेला सभापती पोखरकर, माजी उपसभापती अमोल पवार आणि ज्योती आरगडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा ठराव २७ जुलैला रद्दबातल ठरविला व त्यावर पुन्हा १८ रोजी फेरमतदान घेण्याचे आदेश दिले.
येत्या १८ तारखेलाच नक्की कळणार आहे की राज्यात सत्ता कोणाची असो!पण खेड तालुक्याची सुञे कोणाकडे रहाणार आहे!