रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या सन १९९०-९१ बॅचचा स्नेहमेळावा ऊत्सहात संपन्न!

रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या सन १९९०-९१ बॅचचा स्नेहमेळावा ऊत्सहात संपन्न!

कडूस प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

कङूस (ता.खेड) येथील कङूस इंग्लिश स्कूल, रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या सन १९९०-९१ मध्ये एकाच बाकावर बसलेले व पुढील आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले सवंगडी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल तीस वर्षांनी पुन्हा एकत्र आले होते.
रामभाऊ म्हाळगी विद्यालयातील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहाने नुकताच संपन्न झाला. 
आनंद, आश्चर्य आणि कौतुक अशा संमिश्र भावना सवंगड्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
माजी विद्यार्थी वामन गारगोटे यांच्या विशेष प्रयत्नातुन माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला.
दहावीच्या बॅचचे दिनेश पानसरे, उमेश ढमाले, अशोक दुधाळे, सुहास बारणे, विजय करंडे, मोहन गायकवाड, राजू शिंदे, सहादु गायकवाड, विष्णू तुपे, सुबोध जाधव, विमल कोल्हे, कविता बनकर, रेवती महाजन, बाबा ढमाले, चंदू जाधव, मधुकर बनकर, मंगेश पाचंगे, नवनाथ कडूसकर, संजय बारणे, विलास सुकाळे, अशोक ढमाले, संदिप ढमाले, नारायन दौडकर, बाळू बोरकर, रविंद्र चिपाडे, ताज शेख, संदिप बोर्हाडे, गुलाब नेहेरे, नितिन काळोखे, मिरा नेहेरे, सत्यभामा लोहार आदी सह सत्तर विद्यार्थी आजही शिक्षकाकडुन आयुष्याचे धडे घेण्यासाठी वर्गात उपस्थित होते.
३० वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या मित्राच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद, मस्ती, आश्चर्य आणि कौतुक अशा संमिश्र भावना सवंगड्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.
भेटीच्या आनंदासोबत आठवणींच्या दुनियेत रममान होताना डोळ्यांतून डोकावणारे अश्रूही अनेकांना थोपविता आले नाही. एकमेकांशी हितगूज करताना शालेय जीवनातील आठवणींची पाने परस्परांच्या साथीने उलगडू लागली. तसतसे भूतकाळात शिरताना आणि वर्तमानाची त्याच्याशी सांगड घालताना सर्वांनाच अनोख्या दुनियेची सफर घडली माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातील सुखानुभूतीचा प्रत्यय रोमांचित करून गेला.
यावेळी वैजू बारणे, वैशाली बारणे या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रथम शिक्षकांचा सत्कार करत त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी शशिकांत खळदकर, निलेश साखरे, राजेंद्र अरगडे, संतोष अरगडे, योगिता घोडेकर माजी विदयार्थ्यांनी तत्कालीन गमती जमती, सुख, दुःख, झालेल्या चुका, मिळालेले यश, मनात राहिलेले शल्य व्यक्त करत कायर्क्रमा मध्ये रंगत आणली. वर्गामध्ये ज्ञानाचे धडे देणाऱे तत्कालीन शिक्षक कि. का. दाणी, खंडेराव दामोधरे, विनायक सुमंत, अनिता पारखी, रामकृष्ण पवळे, संजय शिंदे, संपत चिपाडे, बाळासाहेब गारगोटे, यांनी मेळाव्यामध्ये मुलांना समाजामध्ये कसे वागावे याचे धडे दिले.
——————————————————————

तिस वषार्नी भेटलेल्या मित्र मैत्रिणींनी यापुढेही व्हॉटसॅप, फेसबुक, मोबाईल व प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून संपकार्त राहण्याचा संकल्प केला. गरजेनुसार शाळेस आवश्यक ती मदत करण्याचा निश्चय विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
मोबाईलने संपर्काचा वेग वाढला असून हजारो मैलावर दूर असलेल्या व्यक्तिंच्या सपर्कात जाणे क्षणात शक्य होत असले तरी त्यामुळे माणसांची भेट दुरापास्त झाली आहे, दूरावलेली भेट जवळ करण्यासाठी आता पुढाकार घेण्याची गरज असून शक्य तेवढा मोबाईलचा वापर कमी करून प्रत्यक्ष भेटण्यासाठी स्नेहमेळावा दरवर्षी आयोजीत होणे गरजेचे असल्याचे मत कि. का. दाणी यांनी व्यक्त केले.