राष्ट्रवादी काॅग्रेस लिगल सेलचे अध्यक्ष अरुण मुळूक  यांच्या वाढदिवसानिमित्त राजगुरुनगर न्यायालयात व आखरवाडी मोहरवाळ जि. प. शाळेत वृक्ष कुंड्यांचे वाटप

राष्ट्रवादी काॅग्रेस लिगल सेलचे अध्यक्ष अरुण मुळूक  यांच्या वाढदिवसानिमित्त राजगुरुनगर न्यायालयात व आखरवाडी मोहरवाळ जि. प. शाळेत वृक्ष कुंड्यांचे वाटप

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक खर्च  टाळून पर्यावरणाचे महत्व जाणून राजगुरुनगर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड अरूण जी मुळूक यांच्या वाढदिवसानिमित्त राजगुरुनगर न्यायालयात व आखरवाडी मोहरवाळ जि.प. शाळा येथे वृक्ष कुंड्यांचे वाटप करण्यात आले. राजगुरुनगर व जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. श्री. ए एम अंबाळकर साहेब व राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड देवीदासजी शिंदे पाटील  यांच्या हस्ते वृक्ष कुंड्या अर्पण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे  न्यायाधीश माननीय ए एम अंबाळकर साहेब, राजगुरुनगर न्यायालयाचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश माननीय श्री जी बी देशमुख साहेब, राजगुरुनगर न्यायालयाचे कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश माननीय श्री डी बी पतंगे साहेब, दिवाणी न्‍यायाधीश कनिष्‍ठ स्‍तर एन एस कदम मॅडम, राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष देविदास शिंदे, माजी अध्यक्ष ॲड अनिल राक्षे, माजी अध्यक्ष ॲड बाळासाहेब लिंबोरे पाटील, अॅड समीर कुलकर्णी, अॅड वैभव कर्वे, अॅड माणिक वायाळ,ॲड अतुल गोरडे, अॅड उज्ज्वला माळी, अॅड बिभीषण पडवळ, अॅड राजेश कुलकर्णी, अॅड सुनील चव्हाण, ॲड सुवर्णा ढोरे  इत्यादींसह वकील उपस्थित होते.

तसेच आखरवाडी मोहरवाळ येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये आखरवाडीच्या सरपंच मोनिकाताई मुळूक यांच्या हस्ते वृक्ष कुंड्या अर्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आखरवाडी च्या सरपंच मोनिकाताई मुळूक, ॲड अरुण मुळूक, ग्रामपंचायत सदस्य नीलमताई मुळूक, अशोक मुळूक, ग्रामसेवक शिरसाट साहेब, मुख्याध्यापिका साळूंके मॅडम, शिक्षक कैलास मुळूक, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष नवनाथ मुळूक, विलास मुळूक, दिगंबर मुळूक, ज्ञानेश्वर धर्माजी मुळूक, तबाजी रणपिसे,वंदना मुळूक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ मुळूक इत्यादींसह नागरिक उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अॅड अरुण मुळूक यांच्यातर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.