रौधळवाडी येथील अंगणवाडी शाळेची पावसामुळे पडझड.

रौधळवाडी येथील अंगणवाडी शाळेची पावसामुळे पडझड.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

कोहिंडे बुद्रुक (ता.खेड) गुरवार पासून परिसरात सतत संतधार पडत असणाऱ्या पावसाने रौधळवाडी येथील अंगणवाडी शाळेची भिंत पडली असून कौले, फरशी फुटल्याने शाळेचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले.
कोहिंडे बुद्रुक येथिल रौधळवाडी अंगणवाडीची इमारत मातीची अनेक वर्षी पासून असून या इमारतीला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
अंगणवाडीची एक भिंत पूर्णपणे पडली असून दुसऱ्या एका भिंतीचा कोपरा पडला आहे. भिंत पडल्यामुळे जमिनीची फरशी फुटली आहे. इमारतीची ५० कौले फुटली असून या नुकसानीत इमारतीचे सुमारे ६०हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या अंगणवाडी इमारतीचा पंचनामा ग्रामसेवक गणेश करपे, ग्रामस्थ यांनी पंचासमक्ष जाऊन केला. यामुळे विद्यार्थीची बसण्याची गैरसोय झाली असून लवकरात लवकर शासनाने निधी उपलब्ध करून नविन इमारत बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी हिरामण रौधळ, गजानन रौधळ, बबन रौधळ, अतुल पिंगळे,एकनाथ रौधळ, संतोष कदम, अरुणा चिखले आदी सह उपस्थित होते.