वयाच्या नव्वदीमध्ये चास ता.खेड येथील गंगुबाई टोके या आज्जीची कोरोनावर यशस्वी मात!


वयाच्या नव्वदीमध्ये चास ता.खेड येथील गंगुबाई टोके या आज्जीची कोरोनावर यशस्वी मात!

निवृत्ती नाईकरे पाटील
चासकमान प्रतिनीधी

जुन्या पिढीतील लोक कोरौना सारख्या महामारीवर यशस्वी पणे मात करत असून,आताच्या पिढीपेक्षा त्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती निच्छितच जास्त आहे.
याचे उदाहरण म्हणजे चास येथील प्रगतशिल शेतकरी श्री गणतत झांबर टोके (वय ६०) यांचा कोरोना रिपोर्ट १६/४ रोजी पाॅझिटीव्ह आला होता.या पाठौपाठ त्यांची पत्नी व धाकटा मुलगा यांचे रिपोर्ट पण पाॅझिटीव्ह आले.यानंतर घरातील वयोवृद्ध आज्जी श्रीमती गंगुबाई झांबर टोके (वय ८९)यांचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्यामुळे घरच्यांची चिंता वाढली होती.परंतु या आजीचे नातू चास गावचे माजी सरपंच अनिल टोके यांनी या सर्वांना भोसरी येथे अॅडमिट करण्यासाठी डाॅ.प्रशांत बोर्‍हाडे यांची भेट घेतली पण या वयोवृद्ध आज्जीने मी कुठेही अॅडमीट होणार नाही काय गोळ्या औषध दयायची ती दया मी घरीच बरी होईल हा हट्ट धरला.यामुळे डाॅक्टरांनी घरीच काॅरंटाईन करून उपचारासाठी गोळ्या औषधे दिली.आज्जीच्या या हिमती व खंबीरतेमुळे स्वता सह घरच्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.या आज्जीना बी.पी.चा ञास व वयाची नव्वदी सुरू असून सुद्धा जिद्दीने कोरोनामुक्त झाल्या.जुन्या पिढीतील या खंबीर माणसाकडून संकटावर कशी मात करायची हे शिकण्यासारखे आहे.