वांजुळशेत येथे ग्रामसेवक यांचा निरोप समारंभ

वांजुळशेत येथे ग्रामसेवक यांचा निरोप समारंभ

दशरथ खाडे,भंडारदरा प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण

भंडारदरा(प्रतिनिधी)वांजुळशेत ता.अकोले येथे ग्रामसेवक राजु सुकटे यांचा निरोप समारंभ संपन्न. वांजुळशेत येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक तथा ग्रामविस्तार अधिकारी श्री राजु सुकटे यांची नुकतीच शासकिय नियमामुसार वांजुळशेत या गावामधून अबितखिंड येथे बदली झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम व त्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला . वांजुळशेत येथे त्यांनी सात वर्ष सेवा केली या कार्यकाळात त्यांनी अनेक शासकिय योजना राबविल्या व यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या आहेत . त्यामध्ये पंतप्रधान आवास घरकूल योजना , शबरी घरकूल योजना , रमाई आवास योजना , चौदावा वित आयोग , पेसा निधी , स्वच्छ भारत मिशन , तीन अंगणवाड्या , गाव अंतर्गत रस्ते काँक्रेटीकाण , नळ योजना , शाळा दुरुस्ती , इत्यादी कामे केली . तसेच दलित वस्तीचा शंभर टक्के निधी वापर करुन ही योजना पुर्ण केली केली . दलितवस्तीचा संपूर्ण निधीचा वापर करुन योजना राबविणारे ते तालुक्यातील पहिले ग्रामसेवक आहेत. तसेच त्यांनी ग्रामस्थांच्या हिताच्या अनेक वैयक्तिक योजना राबवून गाव विकसित करण्यास व सुधारण्यास मदत केली आहे . या गावामध्ये सातवर्षे सेवा केल्यानंतर त्यांची प्रशासकीय बदली अबितखिंड या गावी झाली आहे . या कार्यक्रमात शेलदचे सरपंच डॉ . रामनाथ मुठे , माजी पी एस आय पांडूरंग भांगरे , उपसरपंच शांता कोंडार , ग्रामसेवक गिरीश निकम , वनअधिकारी रमेश पाटोळे , प्रकाश टपाल , गोरख सदगिर , प्रल्हाद कोंडारसर , बाळासाहेब मेचकरसर, भाऊ भांगरे, किसन तुकाराम लोहकरे इत्यादीनी त्यांच्या बद्दल आपले विचार भाषणातून व्यक्त केले तसेच ग्रामसेवक राजु सुकटे यांनी सुध्दा आपल्या भाषणातून केलेल्या कामांची माहिती दिली . या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य साळू कोंडार , लता पडवळे , विमल लोहकरे , गंगाराम कोंडार , ग्रामस्थ दुंदा पडवळे , बाळू लोहकरे , नामदेव देठे , लक्ष्मण वाळकरे, रामदास लोहकरे , सुधाकर बर्वे , किसन लक्ष्मण लोहकरे, कृषी सहाय्यक धिंदळे , सुनिल मेचकरसर ,नारायण कोंडारसर, डगळेसर, निवृत्ती लोहकरे , चंदर वाळकरे , पंढरीनाथ बर्वे ,भिमा वाळेकर , इंदू वाळेकर, पूनाजी भांडकोळी, किसन दूंदा लोहकरे , दगडू वाळेकर, सखाराम भांगरे , तुकाराम भांगरे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते . या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच सोमनाथ वाळेकर यांनी सुध्दा ग्रामसेवक राजू सुकटे यांनी गावविकासाठी चांगले काम केले आहे असे सांगून त्यांना पुढील गावात काम करण्यास शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाचे सुत्र संचालन दिनकर बर्वे यांनी केले व आभार भास्कर सदगिर यांनी मानले.